Just For Hearts

Nutrition

सकाळचं Protein = दिवसभराची ताकद

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"सकाळचं Protein = दिवसभराची ताकद"

सकाळचा नाश्ता म्हणजे फक्त पोट भरणं नाही. तो शरीराला "आजचा दिवस लढण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि संरक्षण" देणारा पहिला डोस आहे.

❌ फक्त चहा, ब्रेड, पोहे, शिरा खाल्लं तर काय होतं? → 1–2 तासांत भूक येते → Blood Sugar अचानक वाढतो → दिवसभर क्रेव्हिंग → थकवा, चिडचिड

✅ पण जर Proteinयुक्त नाश्ता केला, तर शरीर म्हणते "आज मी steady आणि energetic आहे!"

सकाळी Protein का आवश्यक आहे?

1️⃣ रात्रभर झोपेत शरीर उपवासात असतं. सकाळी Protein न मिळाल्यास शरीर स्नायूंमधलं Protein तोडून ऊर्जा निर्माण करतं. याला म्हणतात muscle catabolism. म्हणजेच fat न जळता स्नायू कमी होतात.

2️⃣ Proteinमुळे पोट भरल्याची भावना (satiety) लवकर येते. GLP-1, PYY सारखे hormones वाढतात. दिवसभरात भूक कमी होते.

3️⃣ सकाळी insulin sensitivity जास्त असते. Protein घेतल्यास साखर नियंत्रण चांगलं होतं.

4️⃣ Proteinचा वेळ महत्त्वाचा आहे. सकाळी Protein खाल्लं तर ते muscle-building आणि sugar-balance दोन्हीसाठी उपयोगी.

सकाळसाठी सोपे Veg Protein Options: • भिजवलेले हरभरे + शेंगदाणे • मूग डाळ पोहे / बेसन धिरडे • पनीर/टोफू + चपाती • ताक + शेंगदाणा-तीळ-जवसचं पौष्टिक मिश्रण • दुध/दही + नाचणी/ज्वारी भाकरी

Non-Veg Protein Options: • अंडी – उकडलेली / भुर्जी • चिकन रोल / grilled फिश • अंडा + रागी डोसा / पिठलं कॉम्बो

⚠️ सकाळचं Protein टाळणं म्हणजे... 1 दिवसाची सुरुवात स्नायूंचं नुकसान करून करणे 2 वजन कमी करताना ताकदही कमी होणे 3 दिवसभर भूक-थकवा-क्रेव्हिंग यांचा त्रास

✅ सकाळी Protein = स्नायूंचं रक्षण + साखर नियंत्रण + दिवसभर ऊर्जा + sustainable weight loss

📌 तुमचं सकाळचं Protein काय असतं? कमेंटमध्ये सांगा आणि जे खाताय, ते कसं काम करतं हे समजून घ्या!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#morning-protein#protein-breakfast#blood-sugar-control#muscle-protection#healthy-breakfast#weight-loss#nutrition
Share:WhatsAppXFacebook