Just For Hearts

Lifestyle

सकाळी Morning Stretching का आवश्यक आहे?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराला जड-जड, stiff आणि सुस्ती वाटते का?

तुम्ही exercise करत असाल किंवा नाही, तरी फक्त 2–3 मिनिटांचं morning stretching शरीराला ON मोडमध्ये टाकतं आणि दिवसाचा गेम बदलतो.

Morning Stretching का महत्वाचे?

1. रात्री शरीर ‘slow mode’ मध्ये जातं, आणि stretching ते रीस्टार्ट करतं. झोपेत joints stiff होतात, muscles contract होतात. हलक्या stretching मुळे blood flow वाढतो, pain आणि stiffness कमी होतो.

2. तुम्ही exercise करत नसाल तरी stretching तुमच्या शरीराला exercise साठी तयार करतं. Stretching म्हणजे mobility आणि flexibility वाढवणं, तर exercise म्हणजे strength आणि stamina वाढवणं. दोन्ही वेगळे आहेत आणि सकाळी stretching exercise पेक्षा आधी करायचं.

3. कसं करायचं? (सोपं 2–3 मिनिटांचं routine) - Neck rotations - Shoulder rolls - Arm stretch - Cat–camel - Ankle circles प्रत्येक 10–15 सेकंद pain-free range मध्ये करा.

4. काय करू नये? - झटके देऊन जोरात stretch करू नका. - Pain होत असेल तर लगेच थांबा. - सकाळी उठल्यावर कठीण yoga poses करू नका.

5. काय काळजी घ्यावी? - Balance कमी असेल तर खुर्ची पकडून करा. - Spine, hip किंवा knee problems असतील तर floor stretches टाळा. - Dizziness येत असेल तर bed → sitting → standing हळू हळू करा.

6. Warm-up लागतो का? पहाटे शरीर थंड असतं, म्हणून हलक्या movements, deep breathing आणि gentle rotations ने सुरुवात करा, हे stretching साठी perfect warm-up आहे.

7. Diabetes मध्ये फायदेशीर कारण circulation सुधारतो, हलका stretching glucose uptake वाढवतो, cortisol कमी करतो आणि सकाळचे sugar swings शांत होतात.

8. Heart health साठी सुरक्षित mobility boost. Slow stretching Blood Pressure stable ठेवतो, cardiac load वाढवत नाही आणि breathing rhythm सुधारतो.

9. Weight management ला मदत होते, NEAT activity वाढते. Stretching केल्यावर movement effortless होते, त्यामुळे दिवसभर जास्त steps आणि जास्त calorie burn होतो.

10. पहिले 5–7 दिवस stiffness जास्त वाटेल, पण सतत केल्यास joint mobility, posture आणि energy सगळं visibly सुधारतं.

तुमची सकाळची stretching routine किती मिनिटांची आहे?

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#morning-stretching#mobility#flexibility#diabetes-care#heart-health#weight-management
Share:WhatsAppXFacebook