Just For Hearts

Lifestyle

रुग्ण नाही… देशाचं future बेडवर पडलं होतं

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"रुग्ण नाही… देशाचं future बेडवर पडलं होतं."

(साखर, BP आणि textbook symptoms पेक्षा पुढे एक गोष्ट)

रात्री ८ वाजता, वॉर्ड round सुरू. एका बेडवर २०–२२ वर्षांचा मुलगा. केस विस्कटलेले. डोळे सुजलेले. अंगात बेचैनी.

मनात विचार – "हा आपल्या देशाचा future आहे का?"

Registrar: "Sir, BP normal, pulse stable... history सुरुच..."

मी: "चल, आज history दुसऱ्या style ने घेऊया!"

मी सरळ विचारलं: "किती दिवसांपासून गांजा घेतोयस?"

मुलगा थोडा गडबडला... पण मग म्हणाला – "४–५ वर्षं."

"कोठे मिळतो?" – "पिंपरी पुलाखाली" "आज मिळेल का?" – "हो!" "रेट?" – "१००–२०० मध्ये चिमूटभर मिळतो!"

वॉर्डमध्ये शांतता. Junior डॉक्टर्स गप्प. नर्स गप्प. नातेवाईक थक्क. पण रुग्ण बोलला... कारण प्रश्न खरा होता.

पुढील treatment आणि counselling केली – पण त्या दिवशी फक्त history नव्हती, एक reality check होती.

अशा क्षणांत काय शिकावे – • प्रामाणिक कबुली फक्त सच्च्या संवादातूनच मिळते • reports पेक्षा direct प्रश्न जास्त उघडतात • गांजा आता easily accessible आणि affordable आहे – आणि खूप खोल पसरतोय

एक चिमूटभर नशा हजारो मुलांचं आयुष्य गिळतेय. ती फक्त 'history' नव्हती – ती 'mirror' होती. आणि मी फक्त योग्य प्रश्न विचारला.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#cannabis#substance-abuse#patient-history#ward-rounds#youth-health#counselling#medical-dialogue
Share:WhatsAppXFacebook