Just For Hearts

Heart Health

रिपोर्ट नॉर्मल पण मनात गोंधळ आणि दमलेलं हृदय

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

गेल्या 15–20 वर्षांपासून Heart diseases बदलले नाहीत, पण त्यांची कारणं नक्कीच बदलली आहेत!

ही 10 कारणं आहेत, जी रिपोर्टमध्ये दिसत नाहीत पण आपल्या रोजच्या जीवनात जाणवतात:

1. मोबाईल हा पहिला आणि शेवटचा person आहे! - झोपताना Screen चालू, उठताना Notification – हृदयाला 'Rest Mode' मिळत नाही! 2. Online राडे, Offline झगडे – सतत तापलेलं मन! - ट्रोल्सवर राग येतो, पण BP मोजतोय का? 3. Junk food, जास्त बसणे आणि 'उद्यापासून डाएट' - हे सगळं मिळून हृदयावर भार वाढवत आहे! 4. Stress कमी करण्यासाठी चहा, सिगरेट, दारू – रोजचं कारण! - बाहेर शांतता, पण आतून clogging सुरू आहे! 5. Breakup, mismatch, toxic relation – नात्यांचे जखमा! - शब्द नसले तरी हृदयाला दुखत आहे! 6. कुटुंबात BP आणि Diabetes असणं – पण आपण बेफिकीर राहतो! - Genetic बाबतीत panic नाही, पण planning करायला हवी! 7. Substance abuse – pan masala पासून pills पर्यंत! - तात्पुरती किक, कायमचा धक्का... 8. कोणीतरी गमावले पण दुःख व्यक्त करण्यासाठी वेळ नाही! - आजचं दुःख मिटत नाही, मनात दडतं... आणि हृदय झिजतं! 9. सहनशक्ती कमी – छोट्या अपयशांवर मोडून पडणं - एक rejection, एक failure – आणि मनावर प्रचंड भार! 10. सतत Hustle – "Busy आहे" syndrome! - डोळ्यांत झोप नाही, वेळेवर जेवण नाही – पण success हवी!

हो, Cholesterol, BP, Sugar आणि व्यायामाचा अभाव हे महत्त्वाचे कारणे आहेत...

पण आजकाल हृदयाचं आरोग्य तुमच्या भावनिक आणि सामाजिक जीवनावरही अवलंबून आहे.

Lifestyle म्हणजे फक्त जेवण नव्हे – मनाचा व्यवहार, सवयी आणि ताणांचा प्रवासही आहे.

थांबा आणि स्वतःला विचारा: "तुमचं हृदय खरंच ठीक आहे का?" ❤️

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#heart-health#lifestyle#stress#cholesterol#blood-pressure#diabetes#emotional-health
Share:WhatsAppXFacebook