Just For Hearts

Lifestyle

भारताचा NP-NCD प्रोग्रॅम कसा तुमचा महिन्याचा खर्च कमी करतो

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

अनेक लोक म्हणतात, “दर महिन्याला तपासण्या, औषधे… खर्च खूप वाढतो.”

पण तुम्ही कधी भारत सरकारचा NP-NCD प्रोग्रॅम वापरला आहे का?

हा प्रोग्रॅम मोफत आणि सर्वांसाठी आहे, आणि अनेक आरोग्याशी संबंधित खर्च कमी करतो.

NP-NCD म्हणजे नेमकं काय?

1. 2008 पासून सुरू 2. Chronic diseases साठी free-care program 3. PHC, UPHC आणि जिल्हा रुग्णालयांत उपलब्ध 4. Diabetes, Blood Pressure, Heart disease आणि Cancer सारख्या आजारांसाठी स्क्रीनिंग, तपासणी आणि औषधे मोफत देणं.

काय-काय मोफत मिळतं?

1. तपासण्या: Blood Sugar (RBS/FBS), Blood Pressure, BMI, Waist मोजणी, Lipid profile (अनेक जिल्हा रुग्णालयांत) आणि Cancer screening.

2. औषधे: - Metformin, Glimepiride - Amlodipine, Telmisartan, Atenolol - Statins (Cholesterol कमी करणारी) - Aspirin/Clopidogrel (काही ठिकाणी)

ही औषधे गुणवत्तापूर्ण आणि पूर्णपणे सुरक्षित असतात, WHO protocols प्रमाणे.

3. रेकॉर्ड कसं ठेवतात? - तुमची NP-NCD Health ID / कार्ड तयार केली जाते - प्रत्येक भेटीत Sugar, Blood Pressure, औषधे, ट्रेंड एकाच ठिकाणी नोंदवले जातात - फॉलो-अप करताना continuity doctor साठी खूप महत्वाची आहे

4. तुमच्या नियमित डॉक्टरसोबत हे कसं वापरायचं? - Routine तपासण्या आणि बेसिक औषधे सरकारकडून → तुमचा एकूण खर्च कमी होतो - Specialist कडे advanced guidance, reports evaluation, complications prevention - दोन्ही मिळून Hybrid Model = Best Model

रुग्णाला फायदा: खर्च कमी आणि care quality जास्त.

हा प्रोग्रॅम फक्त ग्रामीण लोकांनी नाही तर शहरी लोकांनीही वापरायला हवा!

शहरी भागात UPHC centers अत्यंत systematic आहेत. रांगा कमी, डेटा व्यवस्थित, औषधे उपलब्ध, पण लोक जात नाहीत.

खरं सांगायचं तर Healthcare महाग नाही. लोक उपलब्ध resources वापरत नाहीत, म्हणून महाग वाटतं.

भारत सरकार याला अधिकृतपणे NPCDCS म्हणते: National Programme for Prevention and Control of Cancer, Diabetes, Cardiovascular Diseases and Stroke.

ही माहिती Share करा. Forward करा. WhatsApp ग्रुपमध्ये पाठवा.

एखादा तरी रुग्ण ज्याचा महिन्याचा खर्च 2–3 हजार असतो, यामुळे कमी होईल.

तुम्ही केलेली ही मदत प्रत्यक्ष जीव वाचवू शकते.

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा शहरांमधील लोकांना ह्याचे महत्व पटणार नाही, परंतु कर्मचारी वर्ग, गरीब घटकातील शहरवासी, गावाकडले आपले बंधू भगिनी ह्यांना ह्याची गरज नक्कीच आहे. त्यांना ही माहीती पोहोचवा किंवा कार्ड काढून द्या.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#npcdcs#public-health#chronic-diseases#diabetes#blood-pressure#heart-disease#cancer#affordable-healthcare
Share:WhatsAppXFacebook