Just For Hearts

Heart Health

OPD कथा | Christmas Special

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

OPD कथा | Christmas Special (काल रात्रीपासून आज सकाळपर्यंतची गोष्ट)

काल रात्री 10:30 वाजता emergency मध्ये 78 वर्षांचे एक काका आले. ते अतिशय sincere, नीटनेटके आणि शांत होते.

Complaint? - अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडणे.

History? BP नाही, Diabetes नाही.

मी नेहमीप्रमाणे विचारायला सुरुवात केली... "कधी चक्कर आली?" "आधी काही त्रास होता का?" "औषधं घेताय का?"

काका आणि त्यांचे family प्रामाणिक होते, पण काही ठोस माहिती मिळाली नाही.

आता पर्याय नव्हता, डॉक्टरांचा reflex ON झाला: - MRI - Holter - Echo करावे लागणार होते.

इतक्यात काकांनी अगदी निरागसपणे सांगितले, "सर, काल संध्याकाळी plum cake खाल्ला होता..."

मी हसलो आणि म्हणालो, "ठीक आहे. मी diet बाबतीत फार rigid नाही. सणावार आहे, भारत म्हणजे सणांचा देश." Christmas vibes, मन मोकळं झालं.

पण नंतर काकांनी खरा twist दिला. ते म्हणाले, "सर, तो plum cake साधा नव्हता..."

आणि मग recipe सुरू झाली: - Plums 6 महिने rum मध्ये भिजवलेले - Cake तयार करताना भरपूर alcohol वापरलेले - वरून "थोडं अजून मऊ व्हायला" म्हणून extra drizzle

आणि आपले काका? - "सरांनी सवलत दिली आहे" या विश्वासावर - मोठा तुकडा खाल्ला.

त्या क्षणी मला diagnosis मिळाला. MRI, Holter, Echo ची गरज नाही.

Diagnosis: Age + Alcohol soaked plum cake = Emergency Visit

मी काकांकडे पाहून म्हणालो, "आता पुढील 6 महिने कोणतीही diet सवलत नाही. Zero discount."

काका शांत होते, पण त्यांची पत्नी समाधानी दिसत होती. ती prescription नव्हे, justice order वाचत होती!

शिकवण (तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी): - "घरचं आहे" म्हणजे harmless नसतं - Recipe कशी आहे हे तितकंच महत्वाचं आहे - Age वाढल्यावर body tolerance कमी होते - सण आनंदासाठी असतात, emergency साठी नाहीत

आणि माझ्यासाठी एक शिकवण: Diet concessions देताना recipe पण विचारावी लागते!

तुमच्याकडे असाही काही "घरचा पण धोकादायक" अनुभव आहे का? Plum cake, modak, sheera, किंवा "फक्त दोन घास" यांचा काही किस्सा? Comments मध्ये नक्की लिहा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#opd#christmas#plum-cake#alcohol#syncope#diet#emergency#cardiology
Share:WhatsAppXFacebook