Just For Hearts

Mental Wellness

Peer Pressure : आजचा अदृश्य तणाव

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Peer Pressure : आजचा अदृश्य तणाव

कधी थेट सांगितलं जात नाही… पण आतून पोखरत जातं. कधी मित्र, कधी नातेवाईक, कधी सोशल मीडियावरचे ‘परफेक्ट’ चेहरे… आजच्या तणावातला सर्वात न दिसणारा पण खोलवर असणारा दबाव म्हणजे Peer Pressure!

प्रत्येक वयोगटात वेगळी रूपं, एकच ताण:

1. तरुण मुलं / कॉलेज विद्यार्थी: - सगळेच late night पार्टी करतायत… मीच का नाही? - Mobile, branded कपडे, trip ला जायचं pressure… - Marks पेक्षा Instagram followers महत्वाचे वाटू लागतात…

2. गृहिणी आणि महिलांमध्ये: - तिचं घर किती सुंदर आहे, मी का नाही जमवू शकत? - सगळ्या weight loss करतायत, मीच जाड का? - सासर–माहेर दोघांनाही खुश ठेवायचं अनोळखी समीकरण…

3. काम करणारे पुरुष: - सगळ्यांना गाडी घेता येते, मला नाही? - Promotion, Package, Prestige, कुठेही कमी पडलो तर? - घर चालवताना स्वतःला हरवून बसतो…

4. वयोवृद्ध: - माझ्या मित्राचा मुलगा परदेशात, माझा अजून इथेच… - Retired झालो म्हणजे संपलो का?

Peer Pressure हाताळण्यासाठी 6 छोट्या स्टेप्स: 1. आपल्या गरजा–मूल्यं स्पष्ट करा : आपण काय शोधतोय ते स्वतःलाच विचारा. 2. डिजिटल डिटॉक्स : सोशल मीडियावरचं तुलनात्मक जग काही खरं नसतं. 3. स्वतःची ताकद ओळखा : तुमच्यात जे आहे, ते इतर कुणातही नाही. 4. नाही म्हणायला शिका : स्वतःला गमावून नाही, जोडून ठेवा. 5. व्यायाम, ध्यान, चालणं : मानसिक ताकद वाढवण्यासाठी हे वरदान. 6. समुपदेशन / बोलणं : गरज वाटल्यास तज्ज्ञांशी बोला; ते कमजोरी नव्हे!

Peer Pressure का हाताळावं? कारण अनावश्यक तुलना मानसिक तणाव, आत्मविश्वास कमी होणे, डिप्रेशन, चुकीचे निर्णय, अगदी आरोग्यावर परिणाम… हे सगळं याचं दुष्परिणाम. आत्महत्या, राग, guilt अनेक केसांमध्ये मूळ कारण हेच दिसतं.

मन सतत इतरांच्या मानांकनात अडकलेलं असेल, तर स्वतःच्या आनंदासाठी जागा उरत नाही.

तुम्हालाही अशा दबावाची जाणीव झाली आहे का? कसा हाताळला? कमेंटमध्ये नक्की सांगा, आपला अनुभव दुसऱ्याला वाचवू शकतो.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#peer-pressure#mental-health#stress-relief#emotional-health#justforhearts
Share:WhatsAppXFacebook