Just For Hearts

Lifestyle

Post-Dinner Walk ही सवय नाही, ती अनिवार्य आहे

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Post-dinner walk ही सवय नाही, ती साखर, Blood Pressure आणि हृदयासाठी अनिवार्य नियम आहे.

जेवणानंतर अचानक sugar, Blood Pressure आणि fat-storage वाढतो, हीच ती वेळ जिथे आपल्या बहुतेक lifestyle diseases सुरू होतात. आणि त्यावरचा सर्वात सोपा उपाय म्हणजे post-dinner walk.

1) Normal व्यक्तीसाठी - “Metabolism Starter” 10–15 मिनिटांच्या चालीनं रात्रीचा metabolism बंद होण्याऐवजी चालू राहतो. परिणाम → bloating कमी, हलकं पोट, चांगली झोप.

2) Obesity असणाऱ्यांसाठी - “Fat Brake System” Clinical studies नुसार जेवणानंतरची हलकी चाल fat storage 30% कमी करते. कारण glucose थेट muscles मध्ये वापरलं जातं, पोटाजवळ साठत नाही.

3) Diabetics साठी - “Sugar Spike Control” (Game-Changer!) 10 मिनिटांची चाल sugar मध्ये 20–40 mg/dL कमी spike करते (Science-backed). Glycemic variability सुधारतो, दिवसाचं average sugar कमी होतं.

4) Heart Patients साठी - “Circulation Booster” जेवणानंतर vagus tone मंदावतो, Blood Pressure आणि Heart Rate वाढतो, heaviness येऊ शकतो.

थोडी चाल (10–15 मिनिटे) काय करते? • स्नायू हालचालीमुळे muscle pump activate होतो • रक्ताभिसरण अधिक समतोल राहतो • जेवणानंतरची Blood Pressure spike कमी होते • हृदयावर अचानक ताण पडत नाही • छातीतला जडपणा व अस्वस्थता कमी होते

म्हणूनच, post-meal walk ही exercise नाही, ती physiological stabilizer आहे, विशेषतः Blood Pressure, diabetes आणि heart-risk असलेल्या लोकांसाठी.

5) पचन सुधारतं (सर्वात कमी ओळखलेला फायदा!) Digestive motility वाढते → acidity, reflux, heaviness कमी होतात. Night bowel rhythm सुधरतो.

“Post-dinner walk ही luxury नाही, ती रोजची heart, sugar आणि weight protection policy आहे.”

Routine कसा असावा? • जेवणानंतर 10–15 मिनिटं • हलकी, conversational pace walk • घरात, galleryत, society मध्ये चालेल • 20 मिनिटांपेक्षा जास्त ताण देणारी heavy walk टाळा

❤️ सगळं science एका वाक्यात: Muscles move → Glucose muscles मध्ये जाते → Insulin demand कमी होते → Sugar, Blood Pressure आणि fat संबंधित spikes कमी होतात.

तुमचे sugar–Blood Pressure–weight post-meal कसे बदलतात हे कधी तपासलं आहे का?

बहुतेकांना खरा pattern माहित नसतो आणि तिथेच disease control चुकते.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#post-dinner-walk#diabetes-control#heart-health#weight-loss#blood-pressure#metabolism#fat-storage#digestion
Share:WhatsAppXFacebook