Just For Hearts
← ब्लॉगवर परत

Diabetes

पोस्ट दिवाळी Diabetes Challenge – दिवस 2: नाश्त्यामध्ये Protein वाढवा

Divya2 मिनिटांचे वाचन
पोस्ट दिवाळी Diabetes Challenge – दिवस 2: नाश्त्यामध्ये Protein वाढवा

पोस्ट दिवाळी Diabetes Challenge – दिवस 2

आजचा फोकस – नाश्त्यामध्ये Protein वाढवा!

आपल्याकडे नाश्त्याला पोहे, उपमा, ब्रेड किंवा चपाती खाण्याची सवय असते. पण नाश्त्यामध्ये Protein आणि Fibre यांचा समावेश किती महत्त्वाचा आहे, याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

चला, आज नाश्त्याला एक Healthy आणि Protein-rich पर्याय करून पाहूया!

SOY-OATS PALAK CHILLA WITH CURD

साहित्य: - 25 g Soybean Flour - 25 g Oats Flour - एक मूठ बारीक चिरलेला पालक - बारीक चिरलेला कांदा - हिरवी मिरची - आलं - जिरे आणि ओवा - कोथिंबीर - मीठ चवीनुसार - 100 g साधे Unsweetened दही

कृती: 1. सोया पीठ आणि ओट्स पीठ एका भांड्यात एकत्र करा. 2. त्यात पालक, कांदा, मिरची, आलं, जिरे, ओवा आणि कोथिंबीर घाला. 3. थोडे पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करा. 4. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल लावून 2 छोटे चिल्ले तयार करा. 5. गरमागरम चिल्ले साध्या दह्यासोबत सर्व्ह करा.

आजचा Hero Ingredient – Soybean Flour

सोया पीठ हे Plant Protein चा उत्तम स्रोत आहे. इतर अनेक पिठांच्या तुलनेत यात Protein जास्त असते. त्यामुळे नाश्त्यामध्ये Protein वाढवण्यासाठी सोया पीठाचा वापर करता येतो.

यातील Protein आणि Fibre मुळे जेवण अधिक संतुलित बनवण्यास मदत होते.

सुमारे पोषणमूल्य (प्रति सर्व्हिंग): - Protein: 19–22 g - Carbohydrates: 28–32 g

Diabetes असणाऱ्यांसाठी ही Recipe का चांगली? - सोया पिठामुळे Protein content वाढते. - ओट्समधील Beta-glucan हे Soluble Fibre आहे. - पालकामुळे अतिरिक्त Fibre आणि Micronutrients मिळतात. - दह्यामुळे Protein आणि Calcium मिळते.

आजचा Challenge: उद्या नाश्त्याला नेहमीचा नाश्ता बदलून ही Recipe करून पाहा!

आजचा एक छोटा प्रश्न: तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये Protein असते का? आणि JFH App वर तुमचा आजचा Meal Track करायला विसरू नका!

लक्षात ठेवा, Diabetes Management मध्ये एखादा एक पदार्थ नाही, तर रोजच्या खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या असतात.

दिव्या सांगलिकर Sports And Clinical Nutritionist Metabolic Health Coach Team Just for Hearts

#diabetes#protein#breakfast#nutrition#soybean-flour#oats#fiber#healthy-recipes
Share:WhatsAppXFacebook