General Health
रॅबिस म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू म्हणजे कायमचा
रॅबिस म्हणजे मृत्यू, आणि मृत्यू म्हणजे कायमचा.
२५ वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून सांगतोय, रॅबिसबद्दल सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या बेजबाबदार, भावनिक आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांमुळे सामान्य लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
- रॅबिस हा १००% प्राणघातक आजार आहे. लक्षणं एकदा सुरू झाली, की काहीही करून वाचवता येत नाही.
- “साबणपाण्याने बरे होते”, “सोपं आहे” अशा वादग्रस्त विधानांचा वैद्यकीय आधार नाही. साबणपाणी फक्त पहिली पायरी आहे, इलाज नाही.
- Post-exposure vaccination आणि Immunoglobulin वेळेत न घेतल्यास मृत्यू निश्चित. यात चूक झाल्याने अनेक केसेस मी स्वतः पाहिल्या आहेत Rural भागात, शहरी भागात सुद्धा.
- Stray dog population ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. दुर्दैवाने अनेकांनी याला फक्त भावना आणि प्रेमाचं रूप दिलंय.
- “Pet lovers” हे AC मध्ये बसून करोडोंचे वकील घेऊन याचिका दाखल करतात, पण एकाही झोपडपट्टीत जाऊन चावलेलं मूल किंवा रक्तस्त्राव करणारा रुग्ण पाहत नाहीत. हे armchair activism आरोग्यासाठी घातक आहे.
- बेजबाबदार Pet owners कुत्र्यांना ना टॅग करतात, ना वॅक्सिन देतात, ना जबाबदारी स्वीकारतात. हा गुन्हा आहे, भावना नाही.
- लहान मुले, वयोवृद्ध, ग्रामीण जनता यांना रॅबिसचा धोका जास्त. यांच्यासाठी हा लेख, फक्त कुत्र्यांसाठी नाही.
- पेट पाळणं हे स्वातंत्र्य असेल, पण इतरांच्या जीवाला धोका देणं ही गुन्हेगारी आहे.
- सार्वजनिक धोरणात खालील गोष्टी आवश्यक आहेत: • कुत्र्यांचे निर्बंधीकरण • सक्तीची लसीकरण व्यवस्था • काटेकोर टॅगिंग आणि नोंदणी • बेजबाबदार पालकांवर कारवाई • ग्रामीण भागात मोफत लसीकरण केंद्रं
भावना झाकता येतात, पण रॅबिसची लक्षणं आणि मृत्यू, कधीच नाही. हे केवळ वैद्यकीय मत नाही, तर मृत्यू पाहिलेल्या डोळ्यांचा अनुभव आहे.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts