Just For Hearts

Lifestyle

रत्नेश्वर महादेव मंदिर, काशी: मातृदिनाची एक गोष्ट

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

रत्नेश्वर महादेव मंदिर, काशी

Leaning Temple of Shiva, काशी

आज Mother's Day निमित्त काशीतल्या एका मंदिराची वेगळी गोष्ट.

Leaning Tower of Pisa बद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल, पण काशीच्या गंगेकिनारी एक शिवमंदिर आहे जे आजही एका बाजूला अलगद झुकलेलं उभं आहे.

हे आहे Ratneshwar Mahadev मंदिर.

पहिल्यांदा पाहिल्यावर नकळत प्रश्न पडतो की हे मंदिर असं का झुकलं आहे?

मग ऐकायला मिळते एक सुंदर आख्यायिका...

राजा Manasingh यांच्या दरबारातील एका मातृभक्त सरदाराने आईच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं.

वर्षानुवर्षांचे कष्ट आणि भक्ती यामुळे मंदिर पूर्ण झालं.

जेव्हा मंदिर पूर्ण झालं, तेव्हा सरदार म्हणाला की आता आईच्या ऋणातून मुक्त झालो, त्या वेळी मंदिर एका बाजूने खचले.

त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली!

ही कथा खरी की आख्यायिका, माहित नाही, पण तिच्यामागची भावना खूप deep आहे.

गंगेच्या काठावर उभं असलेलं ते मंदिर आजही तसंच शांतपणे अलगद झुकलेलं दिसतं.

जणू सांगत असतं, "माणूस कितीही मोठा झाला तरी आईच्या ऋणातून मुक्त होणं कधीच शक्य नाही."

काशीला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.

मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्व मातांना विनम्र अभिवादन.

Dr Ravindra L Kulkarni, Just For Hearts

#mothers-day#kashi#ratneshwar-mahadev#matru-rin#life-wisdom#varanasi
Share:WhatsAppXFacebook