Lifestyle
क्षणभरातील रील पण रिअल आयुष्याचा उद्ध्वस्तपणा
साताऱ्यात एका गाडीचा खोल दरीत पडतानाचा व्हिडिओ पाहिला… क्षणात गाडी गायब झाली.
कदाचित ड्रायव्हिंग करतानाचा थोडासा अविचार, थोडासा अति आत्मविश्वास… पण परिणाम?
माझ्या २५ वर्षांच्या वैद्यकीय प्रवासात अपघातातील असंख्य patients पाहिले आहेत.
- महिनोंमहिने ICU, - शरीरात हालचाल नाही, - असह्य खर्च, - कुटुंबाचं आयुष्य भरकटलेलं, - निराधार झालेली लेकरं, - रडणारे वृद्ध आईवडील…
रुग्णाचं दु:ख समजतं, पण खरं आयुष्य बदलतं ते कुटुंबाचं!
कधी रुग्ण वाचतो – पण पूर्णपणे अधू, अशक्त, परावलंबी. कधी मृत्यू होतो – आणि मग मागे उरतात कर्ज, चिंता आणि आयुष्यभराचं दुःख.
ही केवळ चूक नाही – ही ‘दायित्वाची घसरण’ आहे!
आज जर तुम्ही कुणाच्या “बेजबाबदार वागण्याच्या” पाठिशी उभे आहात – मग तो मुलगा असो, मित्र, बहीण, कर्मचारी – तर त्याच्या चुकीत तुम्हीही सहभागी आहात.
अपघात कधी कधी चुकून होतो unfortunate… पण बेजबाबदारपणा माफ नाही.
आज “फक्त थोडा थरार” वाटतो – पण उद्या?
तीच गाडी, तेच ICU, तोच खर्च आणि तीच घरातली भयाण शांतता…
तुमच्या प्रियजनांची काळजी असल्यास Share करा.
नियमित health updates साठी Follow करा.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts