Diabetes
Rice आणि झोप तुमच्या Blood Sugar पातळीवर कसा परिणाम करतो
CGM series सुरू झाल्यापासून अनेकांना एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली आहे: काही वेळा समस्या फक्त अन्नात नसते, तर शरीराच्या response pattern मध्ये असू शकते.
२५+ वर्षांच्या clinical practice मध्ये एक गोष्ट वारंवार दिसली आहे: लोक plate वर खूप लक्ष देतात, पण sleep आणि recovery कडे दुर्लक्ष करतात.
१. Rice sugar वाढवू शकतो. हे खरं आहे, विशेषतः जेव्हा: - मोठ्या प्रमाणात घेतला जातो - polished rice वापरला जातो - कमी protein आणि fiber असतो - उशिरा dinner घेतले जाते - meal नंतर inactivity असते हे spikes वाढवू शकतात.
पण कथा इथेच संपत नाही.
२. Poor sleep सुद्धा glucose response बदलू शकते. एका रात्रीची खराब झोप: - insulin response बदलू शकते - cravings वाढू शकतात - stress hormones वाढू शकतात - recovery कमी होऊ शकते
आणि दुसऱ्या दिवशी, तेच meal असूनही spikes वाढलेले दिसू शकतात.
३. म्हणून काही लोकांमध्ये Rice कमी करूनही spikes control होत नाहीत कारण hidden issues असू शकतात: - sleep debt - stress overload - sitting lifestyle - irregular timing
४. CGM मधला सर्वात रोचक भाग म्हणजे, एका व्यक्तीला एका दिवशी भातानंतर moderate spike आणि दुसऱ्या दिवशी huge spike दिसू शकतो. फरक अनेकदा झोप, stress, activity, previous meal, meal timing मध्ये असतो.
५. Metabolism फक्त calories चा विषय नाही, तर body signalling आणि hormones चा विषय आहे. त्यामुळे "मी sugar खात नाही" किंवा "मी भात बंद केला" इतकं पुरेसं नसतं.
६. मग Rice चुकीचा आहे का? नाही. Context महत्त्वाचा आहे: - quantity - timing - activity - sleep - overall metabolic health हे सगळं एकत्र पाहावं लागतं.
७. म्हणून CGM उपयुक्त ठरू शकतो. तो फक्त sugar दाखवत नाही, तर lifestyle शरीरावर कसा परिणाम करतो हे दाखवतो. अनेक वेळा patients याचा पहिल्यांदा अनुभव घेतात.
लक्षात ठेवा: कधी कधी एक तास जास्त sleep एक वाटी भात कमी करण्यापेक्षा जास्त उपयुक्त ठरू शकतो.
आज रात्री WhatsApp Channel वर एक रोचक CGM graph interpretation share करणार आहोत, नक्की वाचा.
हा post अशा व्यक्तीला share करा ज्यांना वाटतं sugar म्हणजे फक्त गोड खाणं.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts