Weight Management
जर सुरुवात केली असती, तर ती व्यक्ती आज हयात असती
अकोला, महाराष्ट्र येथील 35 वर्षांची महिला रुग्ण, जिने 126 किलो वजन आहे, थकवा, Blood Pressure, Diabetes, सांधेदुखी आणि झोप न येणे या तक्रनीसह आली होती. तिचा व्यायाम शून्य होता, चालणे शक्य नव्हते आणि डाएटवर नियंत्रण हरवलेले होते.
मी ठरवले की डाएटची वाट पाहू नये आणि औषधांनी सुरुवात करायची.
सध्या Injection Semaglutide उपलब्ध आहे:
- आठवड्यातून एक इंजेक्शन - भूक आपोआप कमी होते - Fat loss सुरू होते - सुरुवातीला 10-15 किलो वजन सहज कमी होते - नंतर औषध बंद करून डाएट-एक्सरसाइज सुरू करता येते
पण मी 5 वर्षांपूर्वी 130 किलो वजन असलेल्या 44 वर्षांच्या पुरुषाला वजन ताबडतोब कमी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा ही औषधे भारतात उपलब्ध नव्हती. तो डाएट बद्दल पुढे करण्याचा विचार करत होता आणि अचानक massive Heart Attack झाला, ज्यात तो वाचला नाही.
म्हणूनच यावेळी मी थांबलो नाही.
जेव्हा शरीर हालचाल करत नाही, तेव्हा डाएट, योगा आणि चालणे हे 'उद्याचं टारगेट' बनते, पण औषध हे 'आजचं उत्तर' ठरू शकते.
जर एखाद्या रुग्णाचे वजन 110-130 किलोपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये असे कोणीतरी असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा.
Semaglutide Therapy बद्दल सविस्तर माहिती आणि अनुभव लवकरच शेअर केले जातील. प्रश्न किंवा शंका विचारायला अजिबात संकोच करू नका.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts