Lifestyle
Metabolism सुधारायचा असेल तर सुरुवात Plate पासून नाही तर Pillow पासून होते
Metabolism सुधारायचा असेल तर सुरुवात Plate पासून नाही तर Pillow पासून होते.
झोप Metabolism साठी इतकी महत्त्वाची का?
1. झोप म्हणजे hormonal reset
रात्री: • Cortisol नैसर्गिकरीत्या कमी होतो • Growth hormone वाढतो • Cellular repair सुरू होते
हीच body ची recovery window आहे. कमी झोप = शरीराला stress signal.
2. कमी झोप = भूक जास्त, तृप्ती कमी
आपल्या शरीरात दोन महत्त्वाचे hormones असतात: • Ghrelin → “भूक लावणारा” hormone • Leptin → “पोट भरलं” सांगणारा hormone
Sleep restriction studies (4–5 तास झोप) मध्ये दिसलं आहे की Ghrelin वाढतो आणि Leptin कमी होतो. परिणाम? भूक जास्त लागते. विशेषतः गोड आणि high-calorie पदार्थांची इच्छा वाढते. म्हणजेच, झोप कमी → appetite control कमी.
3. Insulin sensitivity झोपेवर अवलंबून
University of Chicago sleep studies मध्ये फक्त 1 आठवडा कमी झोप घेतल्यावर healthy व्यक्तींमध्येही Insulin sensitivity कमी झालेली दिसली. याचा अर्थ : कमी झोप शरीराला sugar handle करणं कठीण करतं.
4. BP, झोप आणि metabolic recovery
Deep sleep दरम्यान Blood Pressure 10-20% कमी होतो. हा “nocturnal dipping” metabolic recovery चा भाग आहे. Poor sleep मध्ये हा dip कमी दिसतो (non-dipping pattern). Sympathetic overdrive वाढतो. Non-dipping BP हा cardiovascular risk marker मानला जातो.
5. Late night जागरण = metabolic load
Artificial light Melatonin कमी करू शकतो. Melatonin कमी झाला की Glucose tolerance कमी असू शकते (evening physiology). उशिराची स्क्रीन + late dinner हा double metabolic stress ठरू शकतो.
6. Night shift / odd working hours
Shift workers मध्ये: • Insulin resistance जास्त • Obesity risk जास्त • Diabetes risk जास्त (Circadian misalignment research)
Shift टाळता येत नसेल तर: ✔ Fixed sleep window ✔ पूर्ण अंधारात झोप ✔ Shift नुसार light exposure manage करा
सातत्य जितके जास्त, तितकं चांगलं.
7. Weekend catch-up sleep पुरेसं नसतं
आठवड्यात 5 दिवस कमी झोप आणि Weekend ला जास्त झोप हा circadian mismatch आहे. Metabolism ला स्थिर rhythm आवडतो.
8. Fat loss plateau? झोप तपासा
Calorie कमी असूनही जर झोप कमी असेल तर: • Cortisol वाढू शकतो • Insulin sensitivity कमी होऊ शकते • Cravings वाढतात
शरीर stress mode मध्ये जातं. Fat loss मंदावतो. काही रुग्णांत फक्त झोप सुधारल्यावर Weight loss पुन्हा सुरू झालेला मी पाहिलाय.
माझं clinical मत
Metabolism सुधारताना मी नेहमी विचारतो: “तुमची झोप किती तास? आणि किती स्थिर?” Diet / Exercise च्या आधी Sleep correction महत्वाचे. Sleep luxury नाही. Sleep म्हणजे metabolic medicine.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts