Heart Health
घोरणं म्हणजे फक्त आवाज नाही: त्याचे आरोग्यावरील धोके समजून घ्या
घोरणं म्हणजे फक्त आवाज नाही; ते oxygen कमी मिळत असल्याचं आणि हृदयावर ताण येत असल्याचं लक्षण असू शकतं.
घोरणं अनेक घरांत सामान्य मानलं जातं. पण काही लोकांमध्ये ते Sleep Apnea (झोपेत श्वास थांबणं), BP, Heart Attack आणि Stroke चा धोका वाढवू शकतं.
सोप्या, मुद्देसूद पॉइंट्समध्ये समजून घ्या:
1. घोरणं कसं तयार होतं (Mechanism)? झोपेत श्वासमार्ग अरुंद होतो → हवा अडखळते → आवाज निर्माण होतो. वजन, जाड मान, alcohol, nasal block, चुकीची झोपण्याची position कारणीभूत असतात.
2. धोक्याचं घोरणं कसं ओळखायचं? - मोठ्याने रोज घोरणं - झोपेत श्वास थांबतोय असं जाणवणं - सकाळी थकवा, डोकेदुखी - दिवसा झोप येणं = Obstructive Sleep Apnea चा संशय
3. हृदय (Heart), BP आणि मेंदूवर परिणाम रात्री oxygen कमी मिळालं की: - BP वाढतो - हृदयाची गती अनियमित होते - Stroke / Heart Attack चा धोका वाढतो
4. Metabolism, वजन आणि Diabetes शी संबंध Sleep Apnea मध्ये: - Insulin resistance वाढतो - वजन कमी होत नाही - सकाळची sugar वाढलेली राहते म्हणून घोरणं + लठ्ठपणा + Diabetes एकत्र दिसतात.
5. कुठल्या चाचण्या (Tests) गरजेच्या? - BP, वजन, neck circumference - Basic blood tests (Sugar, Lipids) - Sleep Study (Polysomnography / Home Sleep Test) Cost अंदाजे ₹3,000 – ₹10,000 (center व type नुसार)
6. सर्वांना CPAP लागतो का? नाही. - Mild cases → lifestyle correction पुरेसं - Moderate–Severe → CPAP / Oral appliance गरजेचं Treatment severity वर ठरतो, आवाजावर नाही.
7. रुग्णाने काय करावं? Lifestyle correction ने काय बदल होतो? - वजन 5–10% कमी → apnea episodes लक्षणीय घट - Alcohol रात्री टाळणं - Side sleeping - Fixed sleep timing अनेक mild–moderate cases इथेच control होतात.
8. Caregivers (घरच्यांनी) काय लक्ष द्यावं? - श्वास थांबण्याचे episodes observe करा - दिवसा झोप, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होत आहे का पाहा - “तो नेहमी घोरतो” म्हणून दुर्लक्ष करू नका.
9. कधी घोरणं सुरक्षितपणे दुर्लक्षित करता येतं? - फक्त सर्दी/थकवा असताना - BP, sugar normal - दिवसा झोप नाही - श्वास थांबण्याचे episodes नाहीत
10. कधी aggressive उपचार आवश्यक? - BP / Diabetes uncontrolled - Heart disease, stroke history - दिवसा झोपेमुळे driving risk Delay धोकादायक ठरू शकतो.
घोरणं कमी करणं म्हणजे फक्त आवाज बंद करणं नाही तर oxygen, heart आणि मेंदूचं संरक्षण करणं.
वेळीच तपासणी + योग्य उपचार = मोठ्या गुंतागुंती टाळता येतात.
तुमच्या घरात कोणी मोठ्याने घोरणारं आहे का? दिवसा झोप येते का? कमेंटमध्ये लिहा योग्य मार्गदर्शन करूया.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts