Just For Hearts
← ब्लॉगवर परत

Heart Health

Statin ची खरी ताकद Cholesterol कमी करण्यापलीकडे आहे

Dr Ravindra L Kulkarni3 मिनिटांचे वाचन

लाखो लोक रोज Statin गोळ्या घेतात, पण या औषधांची खरी ताकद Cholesterol कमी करण्यापलीकडे आहे.

सर्वसामान्य Statins मध्ये Atorvastatin आणि Rosuvastatin यांचा समावेश होतो, जे 10, 20, 40 mg डोस मध्ये उपलब्ध आहेत.

कोणी Heart Attack नंतर घेतात, कोणी Diabetes मुळे, तर कोणी Cholesterol वाढल्यामुळे. काहीजण वर्षानुवर्षे घेतात; काहीजण Report Normal आला की बंद करतात.

पण या छोट्या गोळीमागील विज्ञान आणि काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

1. एका बुरशीने Heart Treatment बदललं! 1970 च्या दशकात जपानी संशोधक Akira Endo यांनी बुरशीपासून Cholesterol निर्मिती रोखणारा पदार्थ शोधला. यामुळे Statins मुळे Heart Attack Prevention मध्ये मोठी क्रांती झाली.

2. Heart Attack नेहमी मोठ्या Blockage मुळे होत नाही! कधी 30–40% अरुंद करणारा Plaque सुद्धा फुटून रक्ताची गाठ तयार करू शकतो. म्हणून Angiography मधील Blockage ची टक्केवारी म्हणजे संपूर्ण Risk नाही.

3. Statin म्हणजे Blockage विरघळवणारी गोळी नाही! ती LDL कमी करते, Plaque अधिक स्थिर ठेवण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराचं (Endothelium) कार्य सुधारू शकते.

महत्त्वाचं म्हणजे भविष्यात Plaque फुटण्याचा धोका कमी करणं.

4. LDL फक्त 39 mg/dL कमी झाला, तरी किती फायदा? मोठ्या संशोधनानुसार LDL सुमारे 39 mg/dL कमी केल्यास Major Heart आणि Vascular Events चा सापेक्ष धोका साधारण 20–25% कमी होऊ शकतो.

हा दीर्घकालीन सरासरी फायदा आहे; प्रत्येक व्यक्तीचा फायदा तिच्या Risk वर अवलंबून असतो.

5. Cholesterol Normal असतानाही Statin का? Heart Attack, Angioplasty किंवा Bypass नंतर उद्देश फक्त Report Normal करणं नाही; पुढील Heart Attack चा धोका कमी करणं असतो.

Normal Report म्हणजे Risk संपला असं नाही.

6. गोळी बंद केल्यावर काय होतं? LDL काही आठवड्यांत पुन्हा वाढू शकतो. विशेषतः आधी Heart Disease असणाऱ्यांमध्ये उपचार खंडित करणं धोकादायक ठरू शकतं.

औषधामुळे आकडे सुधारले असतील, तर तेच औषध बंद करण्याचं कारण नसतं!

7. Muscle Pain म्हणजे Statin सहन होत नाही? नेहमीच नाही. प्रत्येक स्नायुदुखी Statin मुळे नसते. Dose बदलणं, दुसरी Statin किंवा इतर पर्याय उपलब्ध आहेत.

काहींमध्ये Sugar किंचित वाढू शकते; पण योग्य High-risk रुग्णांमध्ये Heart Protection चा फायदा साधारण अधिक असतो.

8. Fatty Liver असूनही Statin उपयोगी? स्थिर Fatty Liver असलेल्या अनेक रुग्णांमध्ये Statins सुरक्षित असतात. Fatty Liver असल्यामुळेच औषध बंद करण्याची गरज नसते.

अशा अनेक व्यक्तींमध्ये Heart Risk कमी करणं अधिक महत्त्वाचं असू शकतं.

9. गोळी घेताय… पण Target गाठलंय का? औषध सुरू किंवा Dose बदलल्यावर साधारण 4–12 आठवड्यांनी Lipid Profile, नंतर Risk नुसार नियमित Review.

गोळी नियमित घेणं महत्त्वाचं; पण ती अपेक्षित परिणाम देतेय का, हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं.

10. आता महागडी Injections आली, तरी Statin का? PCSK9 Inhibitors, Inclisiran आणि इतर नवीन औषधांमुळे LDL आणखी कमी करता येतो. काही रुग्णांना त्यांची गरज असते.

पण Statins चे Heart Attack कमी करण्याचे दीर्घकालीन पुरावे मजबूत आहेत आणि ती तुलनेने परवडणारी आहेत.

नवीन किंवा महागडं म्हणजे प्रत्येकासाठी अधिक योग्य असं नाही.

लक्षात ठेवा... Heart Protection ही एका गोळीची जबाबदारी नाही. आणि केवळ Lifestyle चीही नाही.

औषध रक्तवाहिन्यांचा धोका कमी करतं. पण चुकीचा आहार, वाढतं वजन, कमी हालचाल, अपुरी झोप, अनियंत्रित BP किंवा Sugar यांचे इतर धोके कायम राहू शकतात.

म्हणून माझा आग्रह पाच गोष्टींवर:

योग्य औषध • योग्य आहार • नियमित व्यायाम • सवयींचं Tracking • वेळेवर Follow-up

Statin सुरू करायची, Dose बदलायचा किंवा बंद करायची हा निर्णय तुमच्या डॉक्टरांसोबत घ्या.

पण रोज औषध घेणं, सवयी सुधारणं आणि Follow-up न चुकवणं ही जबाबदारी तुमच्या हातात आहे.

उद्याची औषधं अधिक प्रगत होतील. पण आजची योग्य औषधं, चांगल्या सवयी आणि सातत्य यांची जागा कोणतीही महागडी Injection घेऊ शकत नाही.

JFH App मध्ये Weight, Waist, Activity, BP आणि Sugar Track करा. तुमच्या Routine मधील बदलते Patterns ओळखा.

Pattern Observe करा. Course Change करा.

Statin विषयी Dose, Side Effects, Reports किंवा औषध बंद करण्याबाबत वैयक्तिक शंका असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

औषध स्वतः सुरू, बंद किंवा बदलू नका. तीव्र स्नायुदुखी, कमजोरी किंवा गडद लघवी असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.

Dr Ravindra L Kulkarni Sr Consultant Physician & Cardiologist Just For Hearts 25+ वर्षांचा Clinical Experience

#statins#heart-health#cholesterol#lipid-profile#heart-attack#angioplasty#pcsk9-inhibitors#fatty-liver
Share:WhatsAppXFacebook