Just For Hearts

Lifestyle

Stress कमी झाला… पण तुमचं Body खरंच ठीक झालं आहे का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Stress कमी झाला… पण तुमचं Body खरंच ठीक झालं आहे का?

1. Stress जातो… पण Body लगेच reset होत नाही.

ताण आला की शरीरात cortisol (stress hormone) वाढतो. ताण गेला तरी cortisol लगेच normal होत नाही, काही तास… कधी कधी 24–48 तास टिकतो.

म्हणजेच, तुम्ही शांत दिसत असता… पण Body अजूनही “alert mode” मध्ये असतं.

2. Inflammation उशिरा कमी होतो.

Stress मुळे वाढलेले cytokines (दाह वाढवणारे रसायन signals) लगेच कमी होत नाहीत. शरीराला “repair mode” मध्ये यायला वेळ लागतो.

3. म्हणूनच stress गेल्यावरही symptoms चालू राहतात.

तुम्ही म्हणता “मी ठीक आहे” पण Body सांगतं अजून नाही. * Fatigue * Brain fog (लक्ष लागत नाही) * झोप बिघडलेली * Acidity / पोट बिघडणं हे सगळं recovery चालू असल्याचं sign आहे.

4. Real-life example:

* मोठं presentation / exam झालं * घरात काही तणाव / भांडण * रुग्णालयात admit नातेवाईक

दुसऱ्या दिवशी कामावर परत * पण लक्ष लागत नाही * Body जड वाटतं

आपण म्हणतो “मी weak आहे”. नाही, हे incomplete recovery आहे.

5. सर्वात मोठी चूक काय होते?

ताण गेला = सगळं normal. लगेच full speed जीवन. * Heavy workout * Junk food * Late night यामुळे inflammation पुन्हा वाढतो.

6. मग योग्य approach काय?

Stress नंतर 24–48 तास = Recovery window.

Rule 1: Slow Down (गती कमी करा) * मोठे निर्णय टाळा. * स्वतःवर pressure कमी ठेवा. यामुळे brain ला शांत होण्याची संधी मिळते.

Rule 2: Sleep Repair (झोप ही दुरुस्ती आहे) * 6–7 तास deep sleep घ्या. यामुळे cortisol ↓ आणि inflammation ↓ होतो. Sleep म्हणजे luxury नाही, ती biological repair आहे.

Rule 3: Gentle Movement (हलकी हालचाल) * चालणं / stretching करा. Heavy gym नाही. यामुळे blood flow ↑ आणि healing fast होते.

Rule 4: Food matters (आहार महत्वाचा) * हलका, home-cooked आहार घ्या. * Processed / packaged food टाळा. यामुळे gut calm राहते आणि inflammation कमी होते.

7. Science काय सांगतं?

Research मध्ये दिसलं आहे की Acute stress नंतर inflammatory markers (CRP, cytokines) काही तास–दिवस वाढलेले राहतात. Repeated stress = chronic inflammation. म्हणजेच “stress गेला” म्हणजे “inflammation गेला” असे नाही.

8. महत्वाचा takeaway:

Stress हा event आहे. Recovery हा process आहे. Event पटकन संपतो, process वेळ घेतो. आणि जर recovery नीट झाली नाही, तर हळूहळू BP, sugar, heart, gut सगळ्यावर परिणाम होतो. ताण control करणं महत्वाचं आहे… पण recovery समजणं हे game changer आहे. Body काय सांगतंय हे समजण्यासाठी tracking गरजेचं आहे. Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत. तुमच्या Body चा pattern समजायला सुरुवात करा.

ताणानंतर तुम्ही recovery ला वेळ देता का? * हो, consciously देतो * कधी कधी * लगेच routine सुरू करतो * कधी विचारच केला नाही.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#stress-recovery#inflammation#mental-health#lifestyle-medicine#heart-health#cortisol#cytokines#sleep-repair
Share:WhatsAppXFacebook