Lifestyle
Stress आता चेहऱ्यावर दिसत नाही, आता तुमच्या watch मध्ये दिसतो
Stress आता चेहऱ्यावर पूर्वीप्रमाणे दिसत नाही. पूर्वी रुग्णांना तणाव स्पष्ट दिसायचा, चेहऱ्यावर थकवा जाणवायचा आणि झोप नसल्याचं बोलण्यात दिसायचं. पण आता अनेक लोक बाह्यदृष्ट्या पूर्णपणे सामान्य दिसतात.
काम सुरू असते, screens सुरू असतात, notifications येत असतात, पण recovery थांबलेली असते. शरीर शांतपणे संकेत देऊ लागते आणि आजकाल हे संकेत watch मध्ये दिसायला लागले आहेत.
ही फक्त technology ची गोष्ट नाही, ही आधुनिक lifestyle शरीरावर काय परिणाम करतेय त्याची एक नवीन भाषा आहे.
1. शरीर सतत “alert mode” मध्ये राहते. पूर्वी physical stress जास्त होता, आता mental load जास्त आहे. Brain rest घेत नाही, त्यामुळे शरीर पूर्ण recover होत नाही.
2. झोप होते, पण recovery होत नाही. अनेक लोक 7-8 तास झोपतात, पण सकाळी freshness जाणवत नाही कारण nervous system अजूनही शांत झालेला नसतो.
3. Stress हा फक्त मनाचा विषय नाही. सतत stress मध्ये राहिल्यावर cortisol आणि stress hormones वाढू शकतात, ज्याचा परिणाम BP, sugar, cravings, belly fat, inflammation आणि heart health वर होतो.
4. आजकाल अनेक लोक physically थकत नाहीत, पण mentally आणि metabolically drain होतात. हे आजार सुरू होण्याआधीच जाणवायला लागते, जे बाहेरून दिसत नाही पण शरीराच्या patterns मध्ये दिसते.
5. Watch आजार diagnose करत नाही. हे समजणं महत्त्वाचं आहे की कोणताही gadget आजार diagnose करत नाही. पण कधी कधी subtle changes दाखवू शकतो जे आपण दुर्लक्षित करत होतो.
6. Data वाढतोय, पण self-awareness कमी होत चाललीय. लोक numbers पाहतात पण स्वतःला ऐकत नाहीत. थकवा, irritability, recovery कमी होणं, शांत बसता न येणं आणि सतत tired वाटणं हेही शरीराचे signals आहेत.
7. Smart healthcare म्हणजे gadgets नाहीत तर योग्य वेळी शरीराचे signals समजून घेणं. Technology awareness वाढवू शकते, पण balance झोप, routine, sunlight, movement, emotional health आणि lifestyle मधूनच येतो.
आज स्वतःला विचारा: “मी खरंच जगतोय आणि recover होतोय की फक्त functional राहिलोय?”
तुमच्या watch मध्ये stress, sleep किंवा recovery alerts दिसतात का? तुमचा अनुभव Comments मध्ये नक्की लिहा कारण भविष्याची healthcare फक्त hospital मध्ये नाही, ती हळूहळू आपल्या हातात येत आहे.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts