Just For Hearts

Heart Health

अचानक बोलण्यात बदल आणि कमजोरी: Stroke लवकर ओळखणे

Just For Hearts3 मिनिटांचे वाचन

अचानक बोलण्यात बदल किंवा एका बाजूचा हात-पाय कमजोर होणे म्हणजे Stroke मध्ये घड्याळ चालू झाल्याचे लक्षण आहे.

Stroke मध्ये सर्वात मोठा शत्रू कोणता? Paralysis? BP? Clot? नाही… सर्वात मोठा शत्रू म्हणजे उशीर.

ICU आणि emergency मध्ये वर्षानुवर्षे एकच pattern दिसतो:

रुग्णाला अचानक: - बोलता येत नाही - शब्द अडखळतात - चेहरा वाकडा दिसतो - एका बाजूला ताकद कमी होते - चालताना तोल जातो

पण घरात पहिली प्रतिक्रिया काय असते? "थोड्या वेळात ठीक होईल…" "BP वाढलं असेल…" "झोप घेतली की बरं वाटेल…"

आणि त्या वेळेत मेंदूचा भाग oxygen शिवाय राहत असतो.

1. Stroke मध्ये “time is brain” ही फक्त ओळ नाही, ICU मध्ये रोज दिसणारी वैज्ञानिक सत्यता आहे.

मेंदूला blood supply थांबली की दर मिनिटाला लाखो neurons नुकसान होऊ शकतात.

म्हणून आज जगभर stroke management मध्ये treatment सोबत timing वरही भर दिला जातो.

2. Stroke treatment गेल्या काही वर्षांत पूर्ण बदलले आहे.

पूर्वी stroke म्हणजे: - कायमचं paralysis - speech जाणं - dependency

पण आता योग्य रुग्ण योग्य वेळेत योग्य center मध्ये पोहोचला तर:

- clot-dissolving injection (thrombolysis) देता येतो - angiography मार्गाने clot काढता येतो (mechanical thrombectomy)

अनेक रुग्णांमध्ये: - बोलणं सुधारतं - हात-पाय पुन्हा काम करू लागतात - चालणं परत येऊ शकतं

3. सर्वात महत्त्वाचा factor म्हणजे medicine नाही, instruments किंवा machine नाही, तर वेळ आहे.

4. पहिले 4.5 तास अजूनही खूप महत्त्वाचे आहेत.

Stroke guidelines आणि मोठ्या clinical studies स्पष्ट सांगतात की symptoms सुरू झाल्यानंतर पहिल्या 4.5 तासांत treatment मिळाल्यास recovery ची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

उशीर जितका जास्त, brain tissue permanently damage होण्याचा धोका तितका जास्त.

5. काही रुग्णांमध्ये treatment window वाढली आहे.

पण याचा अर्थ थांबायला वेळ आहे असा नाही.

Advanced scans मुळे काही निवडक रुग्णांमध्ये 6–24 तासांपर्यंत clot काढण्याची procedure शक्य असू शकते.

पण हे फक्त योग्य center, योग्य imaging आणि योग्य patient selection मध्ये शक्य असते.

म्हणून symptoms सुरू झाले की “वेळ आहे” असं समजणं धोकादायक ठरू शकतं.

6. Stroke मध्ये सर्वात common चूक म्हणजे “wait and watch”.

लोक panic किंवा confusion मुळे उशीर करतात: - “sugar कमी झाली असेल…" - “थोड्या वेळाने बघू…" - “थोडं पाणी प्या… ठीक होईल…"

प्रत्येक मिनिटात brain वाचण्याची शक्यता कमी होत जाते.

7. ICU मध्ये दोन वेगळ्या गोष्टी दिसतात:

- काही रुग्ण 1–2 तासात पोहोचतात, treatment वेळेत होतो, आणि काही दिवसांनी चालत घरी जातात.

- काहीजण 8–10 तासांनी येतात, clot मोठा झालेला असतो, brain damage कायमचं राहतो आणि आयुष्य बदलतं.

फरक अनेकदा stroke च्या severity मध्ये नसतो, तर फरक decision घेतलेल्या वेळेत असतो.

8. Stroke मध्ये urgency म्हणजे panic नाही.

Urgency म्हणजे: - symptoms ओळखणं - वेळ न दवडणं - योग्य center मध्ये त्वरित पोहोचणं

9. एक महत्त्वाची गोष्ट: Stroke मध्ये रुग्णाला pain असणं गरजेचं नाही.

म्हणून अनेक वेळा लोक seriousness ओळखत नाहीत, पण pain नसतानाही brain damage सुरू असू शकतं.

10. “सकाळी जाऊ…” हा निर्णय अनेकदा महाग पडतो.

Stroke रात्री झाला आणि सकाळपर्यंत थांबलो तर life-saving treatment window निघून गेलेली असते.

Stroke मध्ये रुग्ण कधी आला हे अनेकदा recovery ठरवते.

थोडं थांबा आणि स्वतःला विचारा.

हा post WhatsApp groups आणि कुटुंबात नक्की share करा.

ही माहिती आज तुमच्यासाठी नसेल पण योग्य वेळी तुमच्यामुळे कुणाचा brain, बोलणं, चालणं आणि आयुष्य वाचू शकतं.

घरगुती उपाय, massage किंवा wait-and-watch approach टाळा, कारण ते धोकादायक ठरू शकतात.

#stroke#time-is-brain#emergency-care#brain-health#thrombolysis#mechanical-thrombectomy#stroke-awareness
Share:WhatsAppXFacebook