Diabetes
Exercise नाही तरी sugar control शक्य आहे? NEAT समजून घ्या
Exercise नाही तरी sugar control शक्य आहे? हो, जर NEAT समजून घेतलं तर.
Exercise साठी Gym लाच जायला पाहिजे असे काही नाही. रोजच्या साध्या हालचालींमधून जे metabolic काम होतं, त्यालाच म्हणतात NEAT - Non-Exercise Activity Thermogenesis.
थोडक्यात समजून घेऊया:
1. NEAT म्हणजे नेमकं काय? Exercise सोडून उरलेली सगळी हालचाल - चालणं, उभं राहणं, घरकाम, जिने, शरीर हलत ठेवणं हे सगळं NEAT.
2. Diabetes मध्ये NEAT इतकं महत्त्वाचं का? हलती muscles glucose वापरतात. म्हणजे insulin कमी लागतो → insulin resistance हळूहळू कमी होते.
3. Pre-diabetes मध्ये औषध टाळायला NEAT मदत करतो का? हो. जे लोक NEAT वाढवतात, weight + waist control करतात, त्यांच्यात अनेक वेळा औषधांची गरज पुढे ढकलता येते, काहींमध्ये टाळताही येते.
4. Established Diabetes मध्ये काय फरक पडतो? NEAT मुळे: • post-meal sugar कमी वाढते • sugar variability कमी होते • काही रुग्णांत dose escalation टाळता येते (औषध बंद नाही, पण control सोपा होतो)
5. Exercise vs NEAT, काय जास्त महत्त्वाचं? Exercise = planned, वेळेवर, intensity जास्त NEAT = दिवसभर चालणारं metabolic support 👉 Exercise आठवड्यात 4–5 दिवस 👉 NEAT रोज, दिवसभर दोन्ही एकमेकांना पूरक.
6. NEAT चे अजून काही relatable उदाहरणं: • जेवणानंतर 10 मिनिटं चालणं • TV पाहताना दर 20–30 मिनिटांनी उठणं • घरात काम करताना खुर्चीवर न बसता उभं राहणं • दुकान जवळचं असेल तर गाडी न वापरणं • lift थांबवून 1–2 मजले जिन्याने
7. Smartwatch मध्ये काय पाहायचं? Steps पेक्षा हे बघा: • किती वेळ बसून होतात? • किती वेळ standing / moving? • active minutes दिवसभर पसरलेत का?
8. “मी already Exercise करतो, तरी NEAT का?” कारण Exercise 30–45 मिनिटं असतं, पण उरलेले 23 तास metabolism काय करतो, ते NEAT ठरवतो.
9. Guidelines काय सांगतात? ADA, EASD स्पष्ट सांगतात: “Prolonged sitting is harmful, even in people who exercise.” म्हणजे बसणं break करणे फार महत्त्वाचं.
10. 25 वर्षांचा माझा clinical अनुभव काय सांगतो? जे रुग्ण NEAT वाढवतात, ते diet-exercise पेक्षा जास्त टिकाऊ control मिळवतात.
NEAT हा shortcut नाही. तो metabolic system ला रोज “support” देणारा उपाय आहे.
तुमच्या रोजच्या आयुष्यात NEAT कुठे वाढवता येईल? घर, ऑफिस, प्रवास, कुठे शक्य आहे ते सांगा.