Gut Health
रविवारी पचनसंस्थेला विश्रांती का आवश्यक आहे
पचनसंस्थेला रविवारी विश्रांतीची गरज असते!
"कामाला सुट्टी मिळते, पण पचनसंस्थेला का नाही?"
सतत खाणं, चटपटीत आणि जड अन्न, वेळकाळ विसरून खाणं… हे सगळं 'Overloaded Gut Syndrome' निर्माण करतं ज्यामुळे Diabetes, Blood Pressure, acidity, bloating आणि weight gain चे प्रश्न होतात.
👉 दर आठवड्यात एकदा 'Gut Reset' केल्यास संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
वैज्ञानिक आधार: • Harvard Medical School: जेवणांमध्ये अंतर ठेवल्यास microbiome balance सुधारतो आणि inflammation कमी होतो. • Journal of Gastroenterology (2020): Digestive Rest insulin sensitivity आणि fat metabolism सुधारतो.
✅ रविवारी काय करायचं?: 1. दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि चालण्याने करा. 2. नाश्ता - सुपाचं किंवा हलकं. 3. दुपारचं जेवण - उकडलेलं, कमी तेलाचं. 4. संध्याकाळी - फळं, पातळ मूग/चवळी, सूप. 5. रात्रीचं जेवण - 7:30 पर्यंत, अगदी हलकं.
⏳ मधल्या वेळात चहा, स्नॅक्स, आणि packaged पदार्थ टाळा. 💤 झोपण्याआधी 10 मिनिटं चालणं किंवा breathing exercises करा.
❤️ सुट्टीचं Gut शेड्यूल म्हणजे शरीरासाठी detox. हे Dieting नाही, तर शरीराच्या गरजांची शुद्ध काळजी आहे.
🗓️ म्हणूनच रविवार म्हणजे पचनसंस्थेची विश्रांती आणि पुनरुज्जीवनाचा दिवस!
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts