Heart Health
Heart patient असाल तर Swimming सुरक्षित आहे का?
"Heart patient असाल तर Swimming सुरक्षित आहे का?" हा प्रश्न OPD मध्ये खूप वेळा येतो… आणि सरळ उत्तर आहे
हो, Swimming सुरक्षित आहे. पण प्रत्येकासाठी, प्रत्येक टप्प्यावर नाही.
Heart disease मध्ये exercise हा उपचाराचा भाग आहे, पर्याय नाही.
AHA / ESC guidelines नुसार regular aerobic exercise मुळे: 1. BP साधारण 5–7 mmHg ने कमी होतो. 2. Heart capacity सुधारते. 3. दीर्घकाळात Cardiac risk 20–30% पर्यंत कमी होऊ शकतो.
Swimming हा त्यातला एक उत्तम पर्याय आहे, जर योग्य रुग्णात आणि योग्य पद्धतीने केलं तर.
कोणासाठी योग्य? Stable Heart condition असेल तर: 1. Chest pain नाही. 2. Shortness of breath नाही. 3. Dizziness नाही. 4. 20–30 मिनिटं चालणं सहज होतं. अशा रुग्णात Swimming सुरू करता येतं.
Procedure नंतर (Angioplasty / Bypass): 1. साधारण 4–6 आठवड्यांनंतर. 2. जखम पूर्ण भरलेली. 3. दैनंदिन हालचाल सहज. मगच controlled Swimming सुरू करावं.
कधी टाळावं? 1. Chest pain / Shortness of breath / Palpitations / Dizziness. 2. Recent Heart event. 3. Uncontrolled BP / Sugar. या अवस्थेत Swimming "exercise" नाही, तो Risk आहे.
कसं करावं?
1. Intensity (गती): "Talk test" लक्षात ठेवा. पोहताना बोलता आलं पाहिजे. Shortness of breath लागली → जास्त केलं.
2. Duration (कालावधी): सुरुवात 5–10 मिनिटं. हळूहळू 20–30 मिनिटं. आठवड्यात 3–5 वेळा.
3. Breathing (श्वास): श्वास रोखू नका. Smooth rhythm ठेवा.
4. Warm-up / Cool-down: अचानक सुरुवात आणि अचानक थांबणं हे Heart ला आवडत नाही.
काय चुकू शकतं? (Important) * अचानक जास्त केलं → Chest pain / Breathlessness. * थंड पाण्याचा अचानक धक्का → BP, Heart rate वाढ. * चुकीचा श्वास → Dizziness.
त्यामुळे Swimming "safe" आहे पण careless Swimming safe नाही.
सुरू करण्यापूर्वी: 1. Heavy जेवणानंतर लगेच पोहू नका. 2. पूर्ण रिकाम्या पोटीही नको. 3. Medications नियमित. 4. सुरुवातीला एकटं पोहू नका.
Heart patients मध्ये दोन टोकं दिसतात: * "मी काहीच करणार नाही." * "मी सगळं करणार." दोन्ही चुकीचं. योग्य मार्ग - controlled, gradual, moderate movement.
लक्षात ठेवा: हो, Heart patients पोहू शकतात पण स्थिती stable असेल, गती moderate असेल, आणि सुरुवात gradual असेल, तरच.
हृदयाला पूर्ण विश्रांती दिली तर ते कमजोर होतं. हृदयावर जास्त ताण दिला तर ते थकून जातं. हृदयाला योग्य हालचाल दिली, तर ते मजबूत होतं.