Just For Hearts

Lifestyle

45 वर्षांच्या शिक्षिकेचा Sustainable Health चा प्रवास

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

45 वर्षांच्या शिक्षिका काल संध्याकाळच्या OPD मध्ये 12-14 महिन्यांनी follow-up ला आल्या होत्या. त्या medicines नियमित घेत होत्या आणि त्यांच्या तक्रारी किरकोळ होत्या. मी सहज विचारलं, “एवढा गॅप का?”

हसत त्या म्हणाल्या, “सर, तुमचे पोस्ट आम्ही वाचतो, follow करतो. काही त्रासच नाही! शाळेत आमच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये त्यावर चर्चा पण करतो. तुमची Bhuleshwar वरची पोस्ट पाहून आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. आरोग्याचा विषय नव्हता, तरीही इतकं छान मांडलेलं होतं की सगळे विचारात पडलो.”

ते ऐकून जाणवलं की वाचक आता माहितीवरच थांबत नाहीत, तर त्यावर विचार व कृती करू लागले आहेत.

मला खात्री आहे, हे वाचताना तुमच्यापैकी अनेकांना “हो, आपल्यालाही असंच वाटतं” असं जाणवत असेल. हाच तर खरा Behavioral Change आणि Sustainable Health चा पहिला टप्पा आहे.

#behavior-change#sustainable-health#health-education#patient-story#lifestyle-changes#health-awareness
Share:WhatsAppXFacebook