Just For Hearts

Heart Health

Time Is Brain: स्ट्रोकमध्ये तत्परतेचे महत्त्व

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"TIME IS BRAIN"

स्ट्रोकमध्ये treatment मध्ये तत्परता फार महत्वाची आहे!

हिवाळ्यात हार्ट अटॅक वाढतो हे माहीत आहे, पण Stoke म्हणजे मेंदूचा अटॅकही तितकाच धोकादायक आहे आणि वेळेत उपचार केल्यास टाळता येतो.

Ischemic Stroke म्हणजे रक्ताच्या गाठीमुळे मेंदूचा काही भाग अचानक रक्तविहीन होणे, Stroke चे 85% प्रकार असेच असतात.

🚨 स्ट्रोक ओळखण्याचं ‘FAST’ सूत्र: • Face: चेहरा वाकडे होणे • Arm: हातपाय कमकुवत होणे • Speech: बोलणं अस्पष्ट होणे • Time: वेळ वाया घालवू नका, तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा!

🏥 हॉस्पिटलमध्ये लगेच काय केले जाते? 1. CT Brain (Plain) मेंदूत रक्तस्राव (bleed) आहे का हे पाहण्यासाठी 2. Blood Sugar, ECG, Clotting Tests, BP, Creatinine या सुरक्षित उपचारासाठी गरजेच्या चाचण्या

💉 उपचार: Tenecteplase (TNK‑tPA) •✅ आज भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं औषध •✅ वापरणं सोपं – फक्त एकाच वेळचं injection (IV bolus) • डोस: 0.25 mg/kg IV bolus (कमाल डोस: 25 mg) • वेळ: लक्षणं सुरू झाल्यानंतर 4.5 तासांच्या आतच दिलं जावं!

💊 Pre-filled Thrombolysis Kits (उदा. Genova‑tPA Kit / TNK Kit): • डोस आधीच तयार असतो • Injection एकाच वेळेस देता येतो, IV infusion लागत नाही • उपचार जलद, सोपे आणि कमीतकमी वेळेत देता येतात!

💰 खर्च: ₹12,000 – ₹20,000 (औषध + Kit) → ICU, अपंगत्व, आणि पुढचा खर्च टाळण्यासाठी फायदेशीर

⚠️ कोणाला नको? • स्ट्रोक 4.5 तासांपेक्षा जुना • CT मध्ये रक्तस्राव • अत्यंत uncontrolled BP, active bleeding, किंवा recent surgery

🎯 लवकर thrombolysis चे फायदे: • paralysis कमी होतो, recovery शक्य • hospital stay कमी, long-term disability टळते • जीव वाचवण्याबरोबर quality of life सुधारते

📣 लक्षात ठेवा: मेंदूचा स्ट्रोक म्हणजे Brain Attack, जसं हार्ट अटॅकमध्ये वेळीच स्टेंटिंग, तसंच स्ट्रोकमध्ये वेळीच CT आणि Thrombolysis हाच जीव वाचवण्याचा मार्ग!

✅ वेळेवर CT ✅ वेळेवर TNK Injection ✅ वेळेवर निर्णय

ही पोस्ट शेअर करा, वेळेवर माहिती दिल्यास एक जीव वाचू शकतो.

प्रश्न असतील तर खाली विचारायला विसरू नका.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#stroke#tenecteplase#thrombolysis#fast-test#brain-attack#emergency-care
Share:WhatsAppXFacebook