Just For Hearts

Lifestyle

Gout समजून घ्या: प्रत्येकासाठी महत्त्वाचे Facts

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

50 Male Vegetarian अचानक पायाच्या अंगठ्याला तीव्र वेदना, सूज, चालणं कठीण. Uric Acid Normal.

आज OPD मध्ये treatment साठी आलेल्या रुग्णाबद्दल.

Gout: अतिशय common अशा ह्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती:

1. अंगठ्याला अचानक वेदना? Gout असू शकतो. 2. Gout = फक्त सांधेदुखी नाही. तो metabolism चा आजार आहे. 3. वेदना गेल्या? तर आजार गेला असं समजू नका. 4. Uric Acid नॉर्मल? तरीही Gout असू शकतो. 5. वेदना असताना Uric Acid ची गोळी नको. 6. पाणी कमी, उपवास, crash diet म्हणजे Gout ला आमंत्रण. 7. औषधं वेदनेसाठी नाहीत, पुढचा झटका टाळण्यासाठी असतात. 8. “मी शाकाहारी आहे” म्हणजे Gout होत नाही असं नाही. 9. फक्त औषध पुरेसं नाही, जीवनशैली बदल हवेच. 10. वेळेवर सल्ला घेतला तर Gout कंट्रोलमध्ये राहतो.

अशा छोट्या गोष्टी समजल्या तर मोठ्या वेदना टाळता येतात.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#gout#joint-pain#metabolic-health#lifestyle-medicine#patient-education#health-awareness#uric-acid#gout-management
Share:WhatsAppXFacebook