Just For Hearts

Heart Health

Lipid टेस्ट केली… पण त्याचा खरा अर्थ काय आहे?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Lipid टेस्ट केली आहे पण त्याचा खरा अर्थ कळत नाही का? हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:

1. फक्त संख्या बघू नका – प्रमाण (Ratio) बघा. 2. TC/HDL प्रमाण 4 पेक्षा जास्त असल्यास धोका सुरू आहे. 3. LDL/HDL प्रमाण 2.5 पेक्षा जास्त असल्यास ब्लॉकेजचं दार उघडलेलं आहे. 4. TG/HDL प्रमाण 3.5 पेक्षा जास्त असल्यास Diabetes चा सावट आहे. 5. HDL (Good Cholesterol) कमी असल्यास रक्तवाहिन्यांमधील स्वच्छता यंत्रणा ढासळलेली आहे, ज्यामुळे blockages चा धोका वाढतो. 6. LDL (Bad Cholesterol) जास्त असल्यास ब्लॉकेज तयार होत आहे. 7. सगळे ‘normal’ असले तरी ratio बिघडलेलं असल्यास धोका लपलेला असतो. 8. औषध लागेल का आणि सुधारणा किती होईल हे ratios सांगतात. 9. TG/HDL जास्त असल्यास पोटाची चरबी आणि insulin resistance चा इशारा आहे.

रक्तातील खरं धोका 'high' किंवा 'low' मध्ये नाही, तर प्रमाणांच्या गणितात लपलेला असतो!

Ratio सांगतात की रिपोर्ट 'सामान्य' आहे की 'धोक्याच्या वळणावर' आहे.

#cholesterol#lipid-test#heart-health#diabetes#ldl#hdl#tg#ratios
Share:WhatsAppXFacebook