Just For Hearts

Mental Wellness

Panic Attack समजून घ्या: Symptoms, कारणं आणि Management

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

अचानक धडधड, श्वास वाढतो… आणि वाटतं ‘आता काहीतरी होतंय’. पण बहुतेक वेळा तो Panic attack (अचानक भीती) असतो.

1. Panic attack म्हणजे काय? Panic attack म्हणजे शरीराची Over-protection (अतिसंरक्षण प्रतिक्रिया). खरा धोका नसताना Body “Emergency mode” मध्ये जातं. Adrenaline (Stress hormone) वाढतो, Heart, श्वास, विचार सगळं वेगात होतं.

2. कोणत्या वयात जास्त दिसतं? * 15–25 वर्ष: Exam, Career stress, Overthinking * 25–45 वर्ष: काम, जबाबदाऱ्या, Family pressure * 45+ वर्ष: Health anxiety, Reports ची भीती म्हणजेच हे “वयावर” नाही, Lifestyle आणि मनावर अवलंबून आहे.

3. कसं वाटतं? * जोरात Palpitations * श्वास कमी पडल्यासारखा * Chest मध्ये दडपण * गरगर / अस्थिर वाटणं * “मी Control गमावतोय” अशी भावना Peak काही मिनिटांत येतो, नंतर कमी होतो.

4. सर्वात मोठा गैरसमज “हा Heart attack आहे” असं वाटतं. पण Panic attack जीवघेणा नसतो. Symptoms खरे असतात, पण कारण वेगळं असतं.

5. शरीरात काय होतं? * Sympathetic system (alert- सतर्कता) जास्त Active होते. * Parasympathetic (calm – शांत करणारी प्रणाली) उशिरा सुरू होते. म्हणून शांत व्हायला वेळ लागतो.

6. त्या क्षणी काय करायचं? * श्वास हळू करा (Slow breathing). * स्वतःला सांगा “हे जाणार आहे”. * हलकं चालणं / बसून स्थिर राहणं. Fight न करता Observe करा.

7. काय टाळायचं? * Worst-case विचार. * Google search करून भीती वाढवणं. * वारंवार Pulse / BP check करणं.

8. औषधं कधी? * वारंवार Attacks. * काम, झोप, दिनक्रम Disturb होत असेल. तेव्हा Medication + Counselling उपयोगी.

9. औषधांशिवाय उपाय: * झोप सुधारवा. * Caffeine कमी करा. * नियमित चालणं. * Breathing practice. * विचार ओळखण्याची सवय. हे Long-term Control देतात.

10. Caregivers साठी: * “काही नाही” असं म्हणू नका. * Panic मध्ये व्यक्तीला सुरक्षित वाटणं महत्त्वाचं. * शांत राहून सोबत द्या.

Panic attack खूप Common आहे, पण लोक बोलत नाहीत. समजून घेतले की भीती कमी होते.

“Panic attack म्हणजे धोका नाही… तो शरीराचा Signal आहे, थांबा, समजा.”

तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? हो, वारंवार कधी कधी कदाचित नाही

तुम्ही एकटे नाही… हा अनुभव अनेकांना येतो.

आज हा Post कोणाला तरी Share करा, कदाचित त्याला/तिला याची गरज आहे.

#mental-health#panic-attack#anxiety#stress#mind-body-connection#heart-palpitations#breathing-techniques#caregivers
Share:WhatsAppXFacebook