Heart Health
५ वर्षांनंतरही विसरता येणार नाही अशी एक केस
सुमारे ५ वर्ष झाली... असंख्य केसेसमध्ये अशी एक केस जी कधीही विसरता येत नाही.
रुग्ण वय ५० पेक्षा कमी, आमच्या कोरेगाव, सातारा येथील.
आमच्या टीमने १५ दिवस जीव तोडून प्रयत्न केले.
जगण्याची इच्छा प्रचंड होती, पण COVID Pneumonia काहीही सुधारत नव्हता.
शेवटचे दोन दिवस — ऑक्सिजन ७०–७५%, व्हेंटिलेटरवर...
सकाळी नातेवाईकांना स्पष्टपणे सांगितले की परिस्थिती गंभीर आहे.
तेवढ्यात गावावरून थकलेला भाऊ आला.
तो रुग्णाशी १० मिनिटं बोलला, थोडं हसला, शांत वाटत होतं... आणि अचानक cardiac arrest मुळे बेशुद्ध झाला...
काही क्षणांत तडफड थांबली... आणि सगळं शांत झालं.
कदाचित फक्त भावाला भेटण्यासाठीच जीव ताटकळला असावा.
बंधुप्रेमाचं हे शेवटचं भेटणं... आणि एका डॉक्टरसाठी न विसरता येणारा क्षण.
"काही रुग्ण मनातून जात नाहीत... कितीही वर्षं झाली तरी."
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts