Just For Hearts

Lifestyle

Uric Acid आणि Gout: लक्षणं, कारणं आणि व्यवस्थापन

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"सर, माझं Uric Acid वाढलंय... Gout झालंय का?" हा प्रश्न रोज ऐकतो — आणि उत्तर नेहमी एकच आहे:

उपचार फक्त रिपोर्टवर नाही, तर लक्षणांवर करायचा असतो!

Uric Acid म्हणजे काय? - शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं रसायन. - जास्त झालं आणि बाहेर निघालं नाही, तर ते सांध्यात साचतं. - साचल्यावर सूज, लालसरपणा, दुखणं होते — म्हणजे Gout.

Gout फक्त लक्षणं असतील तरच होतो: - बोटं, पायाचा अंगठा, गुडघा याठिकाणी सूज आणि गरमपणा. - चालताना त्रास. - रात्री दुखणं वाढणं.

Uric Acid का वाढतो? - बीयर, रेड मीट, सुकट, बेकरी फूड. - Painkillers. - पाणी कमी पिणं. - स्ट्रेस आणि बैठे जीवनशैली.

काय खावं: - सफरचंद, पपई, ताजी भाज्या. - ताक, ओट्स, बाजरी. - भरपूर पाणी. - चालणं आणि योग.

काय टाळावं: - अल्कोहोल, रेड मीट, सुकट. - बिस्किटं, बेकरी, राजमा. - अति औषधं — डॉक्टरांशिवाय सुरू करू नका.

Uric Acid ही 'Lifestyle Warning' आहे. औषधं तात्पुरता उपाय आहेत, पण दैनंदिन सवयी कायमचं संरक्षण करतात.

सांध्यांना वाचवायचंय? आजपासून Diet, चालणं आणि संयम यांची तिकडी पाळा.

#uric-acid#gout#joint-pain#diet#lifestyle#health#just-for-hearts
Share:WhatsAppXFacebook