Just For Hearts

General Health

Visceral Fat: पोटातील लपलेली चरबी

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"थोडं पोट आलंय… पण बाकी सगळं ठीक आहे” हे वाक्य OPD मध्ये खूप वेळा ऐकायला मिळतं.

पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट दडलेली असते: सगळी Fat सारखी नसते.

Visceral Fat म्हणजे काय?

आपण जी बाहेर दिसणारी Fat पाहतो, ती फक्त वरची (subcutaneous) असते.

पण पोटाच्या आत, अवयवांच्या भोवती साचणारी Fat म्हणजे Visceral Fat (आतील Fat).

ही दिसत नाही, पण जास्त सक्रिय आणि धोकादायक असते.

ही Fat धोकादायक का? ही फक्त साठवणूक नाही, ही Fat “chemical factory” सारखी काम करते.

ती शरीरात सतत inflammatory signals सोडते.

Visceral Fat वाढली की शरीरात काय बदल होतात? - Oxidative stress वाढतो. - Insulin resistance वाढतो. - शरीरात Inflammation वाढतो.

म्हणजेच, आजारासाठी योग्य वातावरण तयार होतं.

स्वतःचे आरोग्य ओळखणं महत्त्वाचं.

खालील Symptoms असतील तर Visceral Fat जास्त असण्याची शक्यता: - पोट पुढे आलेलं (even without much weight gain) - कंबर वाढलेली - बसून काम जास्त - Energy कमी वाटणं - जेवणानंतर जडपणा

Reports normal असले तरी Risk सुरू असू शकतो.

सोपं उदाहरण: घरात धूर तयार होतो आणि आत कचरा साचलेला आहे, तर धूर जास्त टिकतो आणि पसरतो.

तसंच शरीरात, Visceral Fat हा Oxidative stress (धूर) वाढवणारा आणि टिकवणारा घटक आहे.

OPD मधील वास्तव: अनेक रुग्ण जेव्हा सांगतात, वजन फार वाढलेलं नाही… पण पोट आहे तिथूनच पुढे Diabetes, BP, Heart Disease सुरू होतात.

पोट ही फक्त दिसणारी खूण आहे, खरा प्रश्न आत साचलेल्या Fat चा आहे.

पुढील भागात, आपण जे खातो तेच ठरवतं Oxidative stress वाढणार की कमी होणार: Food आणि Inflammation.

पोट कमी करणं म्हणजे फक्त दिसणं नाही, तर आत चाललेली Disease process थांबवण्याची सुरुवात आहे.

पोटाची आतली Fat (Visceral Fat) इतकी महत्त्वाची आहे हे तुम्हाला आधी माहित होतं का? - हो - नवीन आणि महत्त्वाचं - आता लक्ष देणार

जर उपयुक्त वाटली असेल तर ही Post मित्र-परिवारात जरूर share करा. अनेकांना हा hidden Risk माहितच नसतो.

#visceral-fat#belly-fat#hidden-fat#inflammation#oxidative-stress#insulin-resistance#metabolic-health#heart-health
Share:WhatsAppXFacebook