Just For Hearts

Nutrition

Vitamin B12 घेण्याचे 4 पर्याय – काय, केव्हा, आणि कोणासाठी?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Vitamin B12 आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, आणि तुमच्या गरजेनुसार घेण्याचे 4 मुख्य पर्याय आहेत:

1. आहारातून (Diet Sources): • सौम्य कमतरता असल्यास आहाराने सुरूवात करा. • दूध, दही, चीज, आणि फोर्टिफाइड सीरियल्स घ्या. • पण फक्त आहार पुरेसा नसतो, विशेषतः शुद्ध शाकाहारींसाठी.

2. टॅब्लेट (Oral Tablets): • रोज सकाळी पाण्याबरोबर घ्या. • जर पचन योग्य असेल तर B12 चांगल्या प्रकारे शोषण होते. • सौम्य ते मध्यम कमतरतेसाठी योग्य. • परवडणारी आणि सोपी पद्धत.

3. सबलिंग्वल टॅब्लेट (Sublingual Tablets): • जीभेखाली ठेवायची – थेट रक्तात जाते. • पचनाच्या अडचणी असतील तर उत्तम पर्याय. • जास्त शोषण आणि परिणाम थोडा लवकर दिसतो. • चव सुधारलेली आणि सहज वापरता येते.

4. इंजेक्शन (Vitamin B12 Injections): • खूपच कमी B12 असल्यास, चक्कर किंवा नसांवर परिणाम असल्यास इंजेक्शन योग्य. • सुरुवातीला 3-7 दिवसांतून एकदा, नंतर दर महिन्याला. • डॉक्टरकडूनच घ्यावे लागते. • परिणाम जलद आणि ठोस.

थोडक्यात - • थोडीशी कमतरता? – आहार आणि टॅब्लेट सुरू करा. • पचनात अडचण? – सबलिंग्वल टॅब्लेट निवडा. • B12 खूपच कमी आहे? – इंजेक्शन योग्य. • शंका असतील तर टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

"तुमच्या शरीराला काय लागू पडतं ते ओळखा – आणि B12 कमी होऊ देऊ नका!"

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#vitamin-b12#nutrition#diet#oral-tablets#sublingual-tablets#injections#deficiency
Share:WhatsAppXFacebook