Just For Hearts

Weight Management

NEAT म्हणजे नेमकं काय?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

NEAT म्हणजे नेमकं काय? तुम्ही वजन कमी होण्यामागचं गुपित दुर्लक्ष करताय का?

✅ NEAT : Non-Exercise Activity Thermogenesis संदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे:

1. NEAT म्हणजे काय? व्यायामाशिवाय दिवसभर होणाऱ्या सर्व हालचाली जसे चालणं, घरकाम, उभं राहणं, जिने चढणं यातून होणारा ऊर्जेखर्च. 2. NEAT व्यायाम नसतानाही शरीरातील कॅलरी खर्च वाढवतो. 3. एकाच आहारावर दोघांमध्ये वजनाचं फरक असतो याचे कारण NEAT वेगळं असते. 4. उठसूट हालचाली न करणं ह्यामुळे वजन वाढण्याचं प्रमाण जास्त! सतत बसून काम केल्यास NEAT जवळजवळ शून्य होतो. 5. NEAT वाढवणं म्हणजे लहान गोष्टींच्या सवयी बदलणं: लिफ्टऐवजी जिना, कॉल करताना उभं राहणं. 6. NEAT वाढल्यास insulin sensitivity सुधारते, Diabetes आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 7. सतत चळवळीमुळे metabolism active राहतो आणि दिवसभर ऊर्जावान वाटतं. 8. कामाच्या वेळेत दर 30-60 मिनिटांनी उठून काही मिनिटं चालणं हे NEAT वाढवण्याचं सोपं उपाय. 9. NEAT फक्त fitness साठी नाही तर मानसिक ताजेपणा, झोपेची गुणवत्ता आणि मूड सुधारतो. 10. NEAT हा sustainable weight loss चा scientific secret आहे. लक्षात ठेवा, Gym शिवायही आरोग्य सुधारता येतं!

"तुम्ही दिवसातून किती वेळ workout करता यापेक्षा, बाकी वेळ काय करता हे जास्त महत्त्वाचं!"

🔄 तुमच्यासारखे इतरही लोक ह्या माहितीचा फायदा घेऊ शकतात, लगेच हा पोस्ट शेअर करा.

📲 आता पासून NEAT वाढवायचं ठरवा आणि तुमचं लहान-सोपं ‘movement routine’ कमेंटमध्ये शेअर करा!

Dr. Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI Cardiology Just For Hearts

#neat#weight-loss#lifestyle#fitness#insulin-sensitivity#metabolism#heart-health
Share:WhatsAppXFacebook