Lifestyle
सकाळी उठल्यावर नेमकं काय प्यायचं?
दररोज सकाळी आपण वेगवेगळे reels पाहतो—आज हळद, उद्या जिरे, मग ACV, मग काहीतरी नवीन घटक!
आपण विचारतो—सकाळी नेमकं काय प्यायचं? आणि का?
उत्तर अगदी सोपं आणि वैज्ञानिक आहे:
ब्रश केल्यावर दररोज कोमट पाणी प्या.
फायदे: 1. झोपेत झालेलं डिहायड्रेशन भरून निघतं. 2. कोमट पाणी पचन क्रिया जागृत करतं, ज्यामुळे acidity आणि bloating कमी होतो. 3. आतड्यांची हालचाल सुरळीत होते, ज्यामुळे constipation कमी होतो. 4. भूक लागण्याचा नैसर्गिक सिग्नल मिळतो. 5. शरीराचा temperatureregulation सुधारतो, थंडी आणि उष्णता सहन करण्यास मदत होते.
कोणतेही घटक घालायचे की नाही हे वैयक्तिक आहे. पण दररोज पाणी पिणे ही खरी सवय आहे.
तुमचं शरीर आधी पाणी मागतं, चूर्ण, रस, पावडर किंवा इतर ingredients नकोतर.
हे fancy नाही, पण प्रभावी आहे.
Consistency हा कोणत्याही recipe पेक्षा मोठा आहे.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts