Diabetes
जेवणानंतर Blood Sugar कधी आणि कशी तपासायची?
रुग्णांकडून सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जेवणानंतर Blood Sugar कधी आणि कशी तपासायची याबाबत. काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची स्पष्ट उत्तरे:
1. "जेवण संपल्यावर की सुरू झाल्यावर 2 तासांनी तपासायचं?" जेवण संपल्यावर 2 तासांनी तपासा. याला Post-Prandial 2-hour Glucose (PP2BS) म्हणतात.
2. "Breakfast नंतरही sugar तपासायची का?" हो, विशेषतः uncontrolled diabetes असल्यास किंवा fasting sugar normal असली तरी. सकाळीचा spike सर्वाधिक असतो.
3. "जेवणानंतर चालायचं का?" चालणं चांगलं आहे, पण चाचणीपूर्वी नाही. Exercise मुळे sugar तात्पुरती कमी होते आणि report भ्रामक होऊ शकते. तपासणीनंतर हलकं चालणं उत्तम.
4. "त्या दिवशी औषध घ्यायचं का?" हो, नियमित औषध नेहमीप्रमाणे घ्या. PPG test औषधांच्या प्रभावाखालील blood glucose response दाखवतो, त्यामुळे औषध टाळू नका. फक्त डॉक्टरांनी सांगितलं असल्यासच test औषधांशिवाय करा.
5. "साखर 2 तासांनी तपासायची, पण कधी कधी विसरतो, मग काय?" 15-20 मिनिटं पुढे-मागे चालते, पण 30 मिनिटांपेक्षा जास्त delay टाळा. Spike निघून गेल्यावर sugar कमी दिसते.
6. "जेवणानंतर थोडं गोड खातो, मग तपासणी कधी करावी?" Dessert हा जेवणाचा भाग समजून, sweet खाल्ल्यानंतर 2 तासांनी वेळ मोजा.
7. "दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेस sugar सारखं येतं का?" नाही. दुपारी sugar spike जास्त असतो, रात्री insulin sensitivity कमी असते. त्यामुळे रात्री sugar अधिक राहू शकतो. वेगवेगळे reports येणं सामान्य आहे.
8. "औषध घेतो पण sugar fluctuate का होतं?" Stress, झोपेची कमतरता, missed meals, dehydration, किंवा irregular timing हे मुख्य कारणे आहेत. औषध हा एक स्तंभ आहे; diet, activity आणि mindset तेवढेच महत्त्वाचे आहेत.
9. "लॅबमध्ये sugar तपासणं आणि glucometer ने तपासणं सारखं का?" दोन्हीमध्ये 10-15 mg/dL फरक असू शकतो. लॅब तपासणी अचूक trend साठी आणि glucometer दररोजच्या नियंत्रणासाठी वापरा.
10. महत्वाचे: sugar check करताना ताण, झोप, औषध वेळ यांचा नोंद ठेवा. Trend समजल्यावर उपचार अचूक होतात.
तुमचा sugar check करण्याचा अनुभव काय आहे? कधी timing miss करता का? कमेंट करा आणि ही माहिती इतर diabetics बरोबर शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts