Just For Hearts

Nutrition

शेवटची चिंच कधी खाल्ली होती?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

शेवटची चिंच कधी खाल्ली होती?

लहानपणीच्या कट्ट्यावरच्या चिंच, कैऱ्या आठवत आहेत का? हाताने फोडलेली चिंच, जिभेवर रेंगाळणारी आंबटसर चव, डोळे पिळवटणारी ती मजा...

आजही शरीरासाठी चिंच तितकीच उपयुक्त आहे, पण आपल्या थाळीत ती हरवून गेली आहे!

चिंच खाण्याचे 10 ठोस फायदे:

1. पचनासाठी अमृत: Digestive enzymes (tartaric acid, malic acid) पचनसंस्थेस चालना देतात. 2. साफ लघवी व सूज कमी: नैसर्गिक diuretic. 3. Acidity कमी: Cooling आणि alkaline effect. 4. Antioxidants: शरीरातील chronic inflammation कमी करतात. 5. Vitamin C: रोगप्रतिकारशक्ती वाढवते, संक्रमणांपासून संरक्षण. 6. Iron आणि Magnesium: थकवा, झोपेची तक्रार, स्नायू दुखीवर उपयोगी. 7. Natural Laxative: कब्ज व मलावरोधावर प्रभावी. 8. हृदयासाठी फायदेशीर: LDL कमी करायला मदत (studies show reduction in total cholesterol). 9. डोळ्यांच्या आरोग्यासाठी: Vitamin A आणि lutein. 10. हाडांची ताकद वाढवते: Potassium आणि Calcium चे चांगले स्रोत.

रुग्णांसाठी महत्त्वाच्या सूचना: • Diabetes: गूळ न घालता कमी प्रमाणात चालते, Glycemic index moderate आहे. • BP patients: कमी मीठ वापरून सूप किंवा चटणी घ्या. • Kidney stones: चिंचेत oxalates असतात. रोज न घेता आंतरावर घेणे शहाणपणाचं.

चिंच ही फक्त लहानपणीची चव नाही, तर एक time-tested digestive, antioxidant-rich, immunity booster आहे ज्याला आधुनिक औषधशास्त्र आता मान्यता देत आहे.

पचन, रोगप्रतिकारशक्ती किंवा Iron साठी गोळ्या घेण्याऐवजी, दररोज एक चमचा चिंच पल्प घेऊन पहा!

नैसर्गिक, आठवणींनी भरलेली आणि पोषणदायी.

"जीवनाची गोडसर चव परत आणायची असेल तर चिंच परत थाळीत आणा!"

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#tamarind#digestion#immunity#heart-health#diabetes#blood-pressure#kidney-stones#nutrition
Share:WhatsAppXFacebook