Lifestyle
10 दिवसांसाठी सुरू झालेली Acidity ची गोळी 10 वर्षे का चालू राहते?
सकाळी उठल्यावर Acidity ची गोळी घेणं सामान्य आहे, पण 10 दिवसांसाठी सुरू झालेली गोळी 10 वर्षे का चालू राहते?
Pantoprazole 40, Rabeprazole, Omeprazole, Pan-D सारखी औषधे लाखो लोक रोज घेतात. काहींना Acidity साठी, काहींना Ulcer साठी, तर काहींना Heart Attack नंतर इतर औषधांसोबत!
पण आपण क्वचितच विचारतो: गोळी नेमकी काय करते आणि माझ्या त्रासाचं खरं कारण काय?
चला, या रोजच्या औषधामागच्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया.
1. Acidity ची गोळी Acid बंद करते; कारण नाही! Pantoprazole सारखी PPI औषधे पोटातील Acid निर्मिती प्रभावीपणे कमी करतात. पण Acid Reflux, अपचन, पोट फुगणं आणि Ulcer हे सगळे एकच आजार नाहीत! प्रत्येक पोटाच्या त्रासावर PPI हाच उपाय नसतो.
2. गोळी घेऊनही Acidity का होते? उशिरा Dinner, मोठं जेवण, वाढतं वजन, जेवल्यानंतर लगेच झोपणं किंवा Reflux व्यतिरिक्त इतर कारणं असू शकतात. काहींमध्ये Acid नियंत्रणात असूनही अन्ननलिकेची संवेदनशीलता किंवा Non-acid Reflux मुळे त्रास राहतो. Dose वाढवण्याआधी Diagnosis आणि Routine तपासा.
3. गोळी बंद केली की Acidity दुप्पट? दीर्घकाळ PPI घेतल्यानंतर बंद केल्यावर तात्पुरता Rebound Acid त्रास होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी मूळ आजार वाढला असं नाही. गरज नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने Dose कमी करणं, गरजेनुसार उपचार किंवा पर्याय शक्य आहेत.
4. काहींना 4–8 आठवडे; काहींना वर्षानुवर्षे! साध्या GERD मध्ये अनेकदा मर्यादित उपचारानंतर Review करता येतो. पण गंभीर Esophagitis, Barrett’s Esophagus, वारंवार Bleeding Ulcers किंवा विशिष्ट High-risk परिस्थितीत दीर्घकाळ PPI आवश्यक असू शकते. Duration कॅलेंडर ठरवत नाही; Diagnosis ठरवतो!
5. Heart Attack नंतर Acidity ची गोळी का? Aspirin आणि Clopidogrel सारखी औषधे घेणाऱ्या काही रुग्णांमध्ये पोटातून Bleeding चा धोका अधिक असतो. त्यांना PPI संरक्षण देऊ शकते. पण प्रत्येकाला आवश्यक असेलच असं नाही. Clopidogrel सोबत Omeprazole/Esomeprazole च्या Interaction ची विशेष काळजी घेतली जाते; Pantoprazole अनेकदा प्राधान्याचा पर्याय असतो.
6. वारंवार Ulcer किंवा Acidity? H. pylori तपासलंय का? H. pylori हा पोटात राहणारा जीवाणू काही Ulcers मागचं महत्त्वाचं कारण असतो. निवडक रुग्णांना त्याची Test आणि गरजेनुसार Antibiotic Treatment आवश्यक असते. फक्त Acid कमी करून प्रत्येक Ulcer चं मूळ कारण दूर होत नाही. H. pylori Test आधी PPI काही काळ थांबवावी लागू शकते - डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली.
7. Pan-D आणि Pantoprazole एकच नाहीत! Pan-D सारख्या काही Combinations मध्ये Domperidone असतं. हे औषध प्रत्येकाला आवश्यक नसतं; काही व्यक्तींमध्ये Heart Rhythm चा धोका वाढू शकतो. साध्या Acidity साठी Combination स्वतःहून सुरू करणं टाळा.
8. वर्षानुवर्षे घेतल्याने Kidney, Bones, B12 वर परिणाम? काही अभ्यासांत संबंध दिसले; पण प्रत्येक समस्या PPI मुळेच होते असं सिद्ध झालेलं नाही. काही रुग्णांमध्ये Magnesium किंवा Vitamin B12 कमी होऊ शकतं. प्रत्येकाला नियमित सर्व Tests आवश्यक नसतात. अनावश्यक औषध टाळा; पण आवश्यक औषधाची भीती बाळगू नका.
9. गोळीची वेळ चुकली तर फायदा कमी? बहुतेक नियमित PPIs जेवणाच्या 30–60 मिनिटं आधी अधिक प्रभावी असतात. ही लगेच आराम देणारी Antacid नाही. योग्य वेळ, योग्य Dose आणि योग्य Diagnosis महत्त्वाचे.
10. सर्वात धोकादायक गैरसमज - छातीत जळजळ म्हणजे Acidity! Heart Attack कधी अपचन, छातीत जळजळ किंवा वरच्या पोटातील अस्वस्थतेसारखा जाणवू शकतो. नवीन किंवा असामान्य त्रास, घाम, धाप, छातीत दडपण असल्यास Acidity ची गोळी घेऊन वाट पाहू नका.
लक्षात ठेवा... काही रुग्णांना औषधाची गरज असते. काहींना औषधापेक्षा त्यांच्या आजाराचा पुन्हा विचार करण्याची गरज असते. आणि काहींना दोन्ही!
म्हणून पुढच्या Follow-up मध्ये तीन प्रश्न जरूर विचारा: माझा Diagnosis काय? ही गोळी किती काळ? आणि औषध कमी करण्यासाठी किंवा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी Routine मध्ये काय बदल?
रात्रीचं जेवण वेळेवर, योग्य Portions, जेवल्यानंतर 2–3 तास न झोपणं, वजन नियंत्रण आणि स्वतःचे Food Triggers ओळखणं या सवयी महत्त्वाच्या.
JFH App मध्ये जेवणाची वेळ, वजन, झोप आणि लक्षणांचा Pattern Track करा. कारण अनेकदा उत्तर एका Report मध्ये नाही, तर रोजच्या Routine मध्ये सापडतं.
नवीन औषधं येतील. उपचार बदलतील. पण योग्य Diagnosis, योग्य औषध, योग्य कालावधी आणि योग्य सवयी यांना पर्याय नाही.
Pantoprazole, Pan-D किंवा Acidity च्या औषधांबाबत वैयक्तिक शंका, Reports किंवा Prescription Review साठी JFH ONE शी संपर्क करा.
टीप: औषध स्वतः बंद किंवा बदलू नका. रक्ताची उलटी, काळी डांबरासारखी शौच, गिळताना त्रास किंवा अनपेक्षित वजन घटणं असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी आवश्यक.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी वरिष्ठ Consultant Physician & Cardiologist Just For Hearts 25+ वर्षांचा Clinical अनुभव