Mental Wellness
आठवणी हरवतायत का? अल्झायमर आणि मेंदूच्या आरोग्याची माहिती
आठवणी कमी होणं आता फक्त वृद्धांचं लक्षण राहिलेलं नाही. 35–40 वयोगटातील लोकांमध्येही विसर पडत असल्याचं जाणवतंय.
आठवणी टिकवायच्या असतील तर मेंदूची काळजी घ्या – अजून वेळ गेलेला नाही.
अल्झायमर विषयी १० महत्त्वाचे मुद्दे:
1. अल्झायमर म्हणजे काय? मेंदूतील पेशी हळूहळू नष्ट होतात, ज्यामुळे आठवणी, भाषा आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.
2. आजाराचं वय का बदलतंय? आता फक्त 65+ वयोगटात नाही, तर 30–40 वयातही सुरुवात दिसते.
3. कारणे काय? झोपेचा अभाव, मानसिक तणाव, junk food, व्यायामाचा अभाव, मेंदूला विश्रांती न मिळणं.
4. Diabetes Type 4? मेंदूतील insulin resistance मुळे काही तज्ञ अल्झायमरला "Type 4 Diabetes" म्हणू लागले आहेत.
5. तरुणांमध्ये वाढ का? सतत स्क्रोलिंग, मल्टीटास्किंग, माहितीचा भडिमार यामुळे मेंदूचा थकवा आणि Brain Fog वाढतोय.
6. तणाव आणि झोप: chronic stress आणि poor sleep हे दोन प्रमुख रिस्क फॅक्टर आहेत.
7. आजच्या जीवनशैलीचा दोष: "smart" पण superficial जीवन, विचार न करता फक्त react करणं.
8. समाजावर परिणाम: वृद्धसंख्येऐवजी विस्मरणग्रस्त तरुणांची संख्या वाढेल, ज्यामुळे जबाबदाऱ्या विसरणारी पिढी तयार होईल.
9. काय करावं? झोप सुधारवा, नियमित व्यायाम करा, डाएट सांभाळा, मोबाईल detox करा, मन लावून काहीतरी नवीन शिका.
10. भविष्यातील तयारी: मानसिक आरोग्य आता वैयक्तिक नव्हे, तर समाजाचं collective priority होणार आहे.
आज जितकं लक्ष हृदय आणि Diabetes कडे देतो, तितकंच लक्ष मेंदूच्या आरोग्याकडे देण्याची वेळ आली आहे.
"आठवणी टिकवायच्या असतील तर मेंदूची काळजी घ्या – अजून वेळ गेलेला नाही."
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts