Heart Health
Blockage काढला तरी पुन्हा Blockage का होतो? Diffuse Coronary Artery Disease समजून घ्या
Second Opinion साठी आलेल्या 49 वर्षांच्या एका engineer ने विचारले, “Blockage काढला तरी पुन्हा blockage का होतो?” त्याला गेल्या 10 वर्षांत 2 angioplasty झाल्या आहेत.
ही एक केस नाही, ही एक pattern आहे.
Diffuse / Rapidly Progressive Coronary Artery Disease म्हणजे काय?
1. हा “एक blockage” चा आजार नाही.
एका ठिकाणी मोठा block नसतो, तर अनेक ठिकाणी 30–60% blockages पसरलेले असतात. (Stent फक्त एका ठिकाणी बसतो, disease सगळीकडे असतो.)
2. Blockages लवकर आणि पुन्हा तयार होतात.
आज stent बसतो, काही वर्षांत दुसऱ्या artery मध्ये block होतो. याला rapid progression म्हणतात.
3. Angiography मध्ये काय दिसतं? (महत्त्वाचं)
- लांब segment मध्ये narrowing - Multiple arteries involved - अनेक ठिकाणी “borderline” blockages
हे diffuse disease चे लक्षण आहे.
4. “Stent असूनही त्रास” म्हणजे warning.
- चालताना दम - थकवा - छातीत जडपणा
याकडे दुर्लक्ष केल्यास disease पुढे जात राहतो.
5. Diabetes + BP + Stress = disease accelerator
विशेषतः - sugar control नीट नाही - job stress जास्त - झोप कमी
→ blockages जलद वाढतात.
6. Lifestyle बदल नाहीत तर blockage वाढतो.
औषधं protection देतात, पण - चालणं नाही - वजन कमी नाही - diet timing नाही
→ नवीन blockages तयार होतात.
7. “Procedure म्हणजे इलाज” हा गैरसमज.
Angioplasty म्हणजे blockage काढणं, पण disease control म्हणजे दररोजच्या सवयी बदलणं. हे न समजल्यामुळे पुन्हा procedure लागतो.
8. वारंवार ischemia → Heart Failure लवकर.
Repeated blockages मुळे हृदयाला oxygen कमी मिळतो, muscle कमजोर होतो आणि heart failure लवकर होते.
9. रुग्ण स्वतः कसं ओळखू शकतो?
- कमी वयात multiple blockages - पुन्हा-पुन्हा angioplasty - diabetes + stress
→ हा diffuse / progressive disease असू शकतो.
10. मग योग्य उपाय काय?
फक्त औषधं किंवा stent पुरेसे नसतात. Just For Hearts सारख्या Structured Cardiac Rehabilitation ची गरज असते:
- monitored exercise - sugar/BP control - stress reduction - lifestyle correction - long-term tracking
Specialist म्हणून माझं स्पष्ट मत:
Diffuse coronary disease मध्ये stent नाही, सवयी आणि सातत्य आयुष्य वाचवतात.
आज समजून घेतलं, तर उद्या मोठी किंमत टाळता येते.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts