Weight Management
शरीर “Fixed Energy Budget” वर का काम करतं?
(Herman Pontzer यांच्या संशोधनावर आधारित)
आपण समजतो की जास्त exercise = जास्त weight loss. पण Pontzer यांच्या संशोधनाने एक वेगळंच चित्र दाखवलं.
1. Hadza tribe अभ्यास (Current Biology, 2012) संशोधनातील काही observations: आफ्रिकेतील Hadza लोक दररोज खूप चालतात, शिकार करतात. पण त्यांचा एकूण दिवसाचा calorie burn आपल्यासारखाच आढळला. जास्त हालचाल म्हणजे अमर्याद calories जळणं / burn नाही.
2. शरीर energy “compensate” करतं: आपण exercise वाढवली की शरीर इतर गोष्टींवर खर्च कमी करतं, जसं immune activity, hormone activity. याला Constrained Energy Model म्हणतात.
3. Exercise करा, पण त्याला जादू समजू नका: Exercise आरोग्यासाठी उत्तम आहे. Heart, sugar, mood सुधारतो. पण वजन कमी करण्यासाठी तो एकटाच उपाय नाही.
4. NEAT जास्त महत्वाचं: दिवसभरातल्या छोट्या हालचाली (जिना, चालणं, उभं राहणं) यांचा परिणाम जास्त सातत्यपूर्ण असतो.
5. Diet महत्वाची: जर शरीर energy ceiling ठेवत असेल, तर intake कमी करणं आणि quality सुधारणा अत्यावश्यक आहे.
6. Crash approach काम करत नाही: अचानक खूप exercise केलं तर शरीर adapt होतं. Consistency intensity पेक्षा जास्त महत्वाची.
7. Metabolism slow नाही: तर तो हुशार आहे. तो energy वाचवतो. आपण त्याला confuse करतो अनियमित सवयींनी.
Clear Takeaway:
Weight loss म्हणजे “जास्त burn” नाही. तो आहे: * नियंत्रित intake * नियमित हालचाल * चांगली sleep * कमी stress
Exercise support आहे. Foundation नाही.
एकच प्रश्न:
तुम्ही अजूनही “मी किती जास्त calories burn करू?” यावर लक्ष देता आहात का? की “मी शरीराला रोज योग्य signal देतोय का?”
आजच्या पोस्टनंतर तुम्ही कुठे आहात? * अजूनही “calories burn” mindset * आता “body signals” समजायला लागलं * NEAT आणि routine वर focus सुरू * Sleep + stress कडे लक्ष देतोय