Just For Hearts

Heart Health

Cardiac Rehab का आवश्यक आहे तुमच्या हृदयासाठी?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Cardiac Rehab अजूनही अनेक ठिकाणी सुचवले जात नाही, पण तुमचं हृदय वाचवण्यासाठी हा Structured Program का आवश्यक आहे?

10 महत्वाचे मुद्दे: 1. काय आहे? : हृदय बळकट करण्यासाठी वैज्ञानिक योजना ज्यामध्ये डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचा समावेश असतो. 2. फायदे सिद्ध: AHA नुसार पुन्हा हॉस्पिटलायझेशन 30-40% कमी होते, जीवनाची गुणवत्ता आणि आत्मविश्वास वाढतो. 3. Primary Rehab: BP, Diabetes, Obesity, High Cholesterol, Smoking यांचा नियंत्रण करून भविष्यातील हृदयरोग टाळण्यासाठी. 4. Secondary Rehab: Heart Attack, Bypass, Angioplasty, Valve Surgery, Heart Failure (LVEF <40%) नंतर पुन्हा आजार वाढू नये म्हणून. 5. प्रकार? Hospital-based, Clinic-based, Virtual (घरबसल्या), Hybrid (क्लिनिक+घर). 6. काय शिकवलं जातं? : सुरक्षित व्यायाम, योग्य आहार, ताण नियंत्रण, औषधांचं पालन. 7. का महत्त्वाचं? : हृदयाची ताकद वाढते, गुंतागुंत आणि हॉस्पिटलायझेशन कमी होतात, आत्मविश्वास वाढतो. 8. का दुर्लक्षित? : “घरात आराम पुरे” किंवा “ऑपरेशन झालं की सगळं ठीक” ही चुकीची धारणा. 9. अनुभव: Rehab केलेल्या रुग्णांनी नोकरी आणि दैनंदिन जीवन लवकर सुरू केलं आणि हॉस्पिटल टाळलं. 10. पुढचं पाऊल: Cardiac Rehab हा उपचाराचा भाग करा. ही माहिती शेअर करा, कदाचित कुणाचं आयुष्य वाचेल.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#cardiac-rehab#heart-health#heart-recovery#primary-prevention#secondary-prevention#hybrid-care
Share:WhatsAppXFacebook