Just For Hearts

Heart Health

बायपास / Angioplasty साठी लाखो रुपये जमवतो पण Cardiac Rehab साठी हजार खर्च करायला का जड जातं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

अनेक patients आणि caregivers यांना असा प्रश्न पडतो की बायपास सर्जरी किंवा Angioplasty साठी लाखो रुपये खर्च केल्यानंतर Cardiac Rehab साठी काही हजार रुपये खर्च करायला का जड वाटते?

म्हणूनच Cardiac Rehab अनेकदा दुर्लक्षित राहतो.

आज आपण समजून घेऊया की Cardiac Rehab हा खर्च नाही तर गुंतवणूक का आहे.

Bypass surgery ₹4 ते ₹6 लाख खर्च येतो, Angioplasty ₹2 ते ₹4 लाख खर्च येतो, तसेच ICU, हॉस्पिटल, औषधं आणि तात्पुरती सुटका यांचा खर्चही असतो...

पण काही महिन्यांतच Blood Pressure, Diabetes, वजन वाढणे, दम लागणे, थकवा, confidence कमी होणे, आणि स्ट्रेस पुन्हा सुरू होतो.

Cardiac Rehab प्रोग्रॅमचा सरासरी खर्च ₹15,000 ते ₹25,000 आहे.

यामध्ये संपूर्ण 12 महिने Monitoring असते: व्यायाम, आहार, औषध व्यवस्थापन, मनोबल आणि सतत फॉलोअप.

Cardiac Rehab ही उत्तम ROI असलेली गुंतवणूक आहे:

1. पुनः हृदयविकाराचा धोका 25–40% ने कमी होतो (Reference: AACVPR Guidelines, JACC 2018).

2. दुसऱ्यांदा Angioplasty किंवा Bypass ची शक्यता कमी होते (Lancet Meta-analysis, 2019).

3. Blood Pressure, Diabetes, Cholesterol यांचं नियंत्रण चांगलं राहतं, Doctor-supervised lifestyle सुधारणा होते.

4. औषधांचा डोस कमी होतो आणि side effects कमी होतात, Expert-verified titration support मिळतो.

5. Confidence वाढतो, कामात आणि घरात उर्जा येते, मानसिक स्वास्थ्यात भरघोस सुधारणा होते.

लक्षात ठेवा: Angioplasty किंवा Bypass म्हणजे शेवट नाही, ती एक नवीन संधी आहे. पण जर Rehab तितक्याच गांभीर्याने केली नाही तर लाखो रुपये वाया जाण्याचा धोका वाढतो.

Angioplasty किंवा Bypass केलेल्या लोकांना सांगायचं की Cardiac Rehab शिवाय पूर्ण बरे होणं शक्य नाही.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#cardiac-rehab#bypass#angioplasty#heart-health#rehabilitation#heart-disease#patient-care
Share:WhatsAppXFacebook