Just For Hearts

Lifestyle

तो एवढं ठीक आहे तर मला का त्रास होतोय? वैयक्तिक Health फरक समजून घ्या

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"त्याला एवढं झालं तरी ठीक आहे, मग मला का त्रास होतोय?" ही वाक्य अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्येत अधिक बिघडवते.

यामुळे काय होते? गोंधळ, भीती, चुकीचे निर्णय आणि उपचारांपासून विचलन!

दररोज OPD मध्ये दिसणारी काही ठळक उदाहरणे:

1. "माझ्या वयाचा मामा 3 स्टेंट घातले आहेत पण तो सायकलिंग करतोय... मग मला का धाप लागते?" वय आणि स्टेंट सारखे असले तरी हृदयाची कार्यक्षमता, LV function आणि बाकी Co-morbidities वेगळ्या असतात.

2. "माझ्या मैत्रिणीला Diabetes आहे पण ती गोड खात असते!" ती Sugar spikes सहन करत असेल किंवा तिला Complications झाले नसतील. पण तुमचा Pancreas किती residual insulin देतोय हे कोणी पाहू शकत नाही.

3. "त्याचा Sugar 250 असूनही काही औषध नाही, मग मला insulin का दिला?" Type 1, LADA, MODY, Type 2 हे सगळे Diabetes सारखे दिसतात पण वेगळे असतात. Medicine वैयक्तिक असते, standardized नाही.

4. "आमच्या वॉर्डमधल्या एका माणसाचा 90% ब्लॉकेज असूनही बायपास नाही!" Artery ची anatomy, collateral supply, symptoms, EF हे सर्व निर्णयात महत्त्वाचे असतात. Blockage % हा फक्त एक घटक आहे.

5. "डॉक्टर, शेजारी औषध थांबवून योगा करतोय... मला पण थांबवता येईल का?" Lifestyle reversal छान आहे पण फक्त supervision मध्येच. तुम्ही फसवणुकीच्या वाटेवर जात नाही ना हे पाहणं गरजेचं आहे.

6. "आईचा BP कंट्रोलमध्ये आहे, मग मी त्याच गोळ्या घेऊ का?" एकाच घरात असलो तरी शरीर वेगळं, व्याधी वेगळ्या असतात. Copy-paste treatment धोकादायक आहे.

तुलना ही माहिती नसल्यामुळे होणारी अंधश्रद्धा आहे.

यामुळे रुग्णांची तब्येत बिघडते, डॉक्टरांच्या मार्गदर्शनावर शंका निर्माण होते आणि अर्धवट माहितीवर निर्णय घेतले जातात.

"तुमची केस म्हणजे तुमचीच केस! दुसऱ्याशी तुलना ही वैद्यकीय चुका वाढवते."

- शक्यता, धोके, औषधे, रिपोर्ट्स सगळं वैयक्तिक आहे. - तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी निर्णय घेतात, शेजाऱ्यांसाठी नाही.

तुमच्या आयुष्यात अशा तुलना कुठे अडथळा ठरल्या? कमेंटमध्ये लिहा, इतरांना शिकायला मदत होईल.

अनुभवांची देवाणघेवाण करा, तुलना नव्हे, सहकार्य हवं!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#personalized-care#health-comparison#diabetes#heart-health#patient-awareness#medical-errors
Share:WhatsAppXFacebook