General Health
तुम्हाला सतत थकवा का वाटतो? 11 वैद्यकीय कारणं समजावून सांगितली
"सर, काही केल्या थकवा जात नाही…"
हा हजारो रुग्णांचा कॉमन लक्षण आहे, पण प्रत्येकामागचं कारण वेगळं असतं.
थकवा म्हणजे आजार नाही, तो शरीराचा एक ‘सिग्नल’ आहे.
थकव्यामागची 11 वैद्यकीय कारणं:
1. स्ट्रेस आणि अपुरी झोप ताण किंवा मानसिक थकवा असल्यामुळे शरीर थकलं असतं. अपुरी झोप, विचारांचा ओझा, सोशल मीडियाचा भडिमार यामुळे मेंदू ‘ड्रेन्ड’ होतो.
2. Diabetes / Insulin Resistance साखर वाढली असते पण पेशींना ऊर्जा मिळत नाही. विशेषतः uncontrolled diabetes मध्ये थकवा हा silent signal असू शकतो. जेवल्यानंतर जडपणा, चिडचिड, गोडाची इच्छा वाढते.
3. हृदयविकार / Heart Failure हृदयाची पंपिंग कमी झाल्यामुळे शरीरात रक्ताचा flow कमी होतो, ज्यामुळे सतत थकवा आणि दम लागणे होते. काही रुग्ण म्हणतात ‘माझं BP ठीक आहे’, पण थकवा हा early cardiac marker असू शकतो.
4. श्वसन आजार (COPD / Asthma) सततचा खोकला, दम लागणं आणि शरीराला कमी ऑक्सिजन मिळणं यामुळे थकवा होतो. फुफ्फुसांचं काम कमी झाल्याने चालणंही कठीण वाटू लागतं.
5. थायरॉईड बिघाड (Hypothyroidism) चयापचय मंदावल्यामुळे शरीराची ‘बॅटरी’ झपाट्याने कमी होते. केस गळणे, थंडी वाजणे, आळस वाढणे यामुळे थायरॉईड टेस्ट करणे गरजेचे आहे.
6. फास्टफूड आणि Poor Nutrition शरीर Protein, Iron, B12, Magnesium शिवाय चालत नाही. दिवसभर चहा, बिस्किटं, process food घेतल्याने ऊर्जा टिकत नाही.
7. लिव्हर विकार / Fatty Liver लिव्हर म्हणजे ‘एनर्जीचे रिफायनरी सेंटर’, पण fatty liver मुळे energy conversion थांबतो, ज्यामुळे unexplained थकवा वाढतो. ALT-SGOT/SGPT वाढलेले रुग्ण सतत थकलेले असतात.
8. अॅनिमिया (Low Hemoglobin) हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी मिळतो, ज्यामुळे थकवा, चक्कर, थंडी वाटते. विशेषतः महिलांमध्ये लपलेली anemia silent कारण असू शकते.
9. स्थूलता / Obesity शरीरावर सततचा भार असल्यामुळे चालायला कंटाळा येतो, घाम येतो, झोपेवर लक्ष कमी पडते. Obesity आणि Insulin resistance एकत्र येऊन Dual fatigue cycle तयार करतात.
10. औषधांचे साईड इफेक्ट्स काही औषधे, विशेषतः antidepressants, antihistamines, painkillers थकवा आणतात. औषधे कमी न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
11. दैनंदिन आजारपण आणि मानसिक थकवा कधी कधी आजारी नातलगाची काळजी घेताना आपणच थकून जातो. Caregiver fatigue हीसुद्धा आजारासारखी गंभीर स्थिती आहे.
✅ काय करता येईल? तुमच्या थकव्याची ‘कहाणी’ समजून घ्या. फक्त आराम नव्हे, योग्य निदान आणि उपाय हेच उत्तर आहे.
हा पोस्ट नक्की शेअर करा कारण थकवा कुणालाही येतो, पण योग्य लक्ष दिल्यास आयुष्य बदलू शकते!
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts