Heart Health
Blockage कमी असतानाही Heart Attack का होतो?

Blockage कमी असतानाही Heart Attack का होतो?
उत्तर: रक्तवाहिन्यांमधील दाह / Inflammation
कारण एकच Blockage नाही, तर Plaque चा स्वभाव (stability) आणि तो ठरतो रक्तवाहिन्यांमधील दाहामुळे (vascular inflammation).
1. सुरुवात कुठे होते? (Root cause) Endothelium (आतील संरक्षणात्मक थर) म्हणजे रक्तवाहिन्यांचं आतलं आवरण. Sugar, BP, Smoking, Stress यामुळे त्याचं नुकसान होतं. Nitric Oxide (रक्तवाहिन्या सैल ठेवणारा घटक) कमी होतो. इथेच दाह सुरू होतो.
2. मग Plaque कसा तयार होतो? LDL Cholesterol त्या जागी साचतो. शरीर त्याला Injury समजतं. Immune Cells जमा होतात. Fatty Streak → Plaque तयार होतो.
3. Unstable Plaque हाच खरा धोका सगळे Plaque सारखे नसतात. काही Stable (घट्ट), काही Unstable / Vulnerable (नाजूक). दाह जास्त असेल तर Plaque नाजूक बनतो.
4. Heart Attack कसा होतो? नाजूक Plaque फुटतो (Plaque Rupture). Clot तयार होतो. Blood Flow अचानक बंद होतो 👉 Heart Attack / Stroke. म्हणूनच कमी Blockage + जास्त दाह = जास्त धोका.
5. Young Heart Attacks का वाढत आहेत? आजकाल तरुणांमध्ये Sugar Spikes, Stress, Sleep कमी, त्यामुळे Inflammation जास्त. Blockage कमी असतो पण Plaque Unstable असतो म्हणूनच Sudden Attack येतो.
6. दाह / Inflammation कमी केला तर काय होतं? - Plaque Stable होतो. - Rupture चा धोका कमी होतो. - नवीन Plaque तयार होणं कमी होतं. हेच खरं Protection.
7. आता मुख्य - Vessel Inflammation कसं कमी करायचं? - Sugar Control: High Glucose → Endothelial Damage. HbA1c Control = Vessel Protection. - BP Control: High Pressure = सतत Injury. BP Stable = दाह कमी. - Smoking बंद: Nitric Oxide कमी. थेट Endothelial Damage. - Walking / Activity: Endothelium Function सुधारतो. Nitric Oxide वाढतो. - Sleep: Repair Process Active होतो. Inflammation कमी. - Stress Control: Cortisol वाढतो → दाह वाढतो. Plaque Instability वाढते. - Anti-inflammatory Lifestyle: Gut Health, Meal Timing, Natural Food (यावर पुढे सविस्तर बोलू). - Medicines (Doctor Guided): Statins फक्त Cholesterol कमी करत नाहीत तर Inflammation कमी करतात, Plaque Stable करतात. - Erectile Dysfunction (महत्त्वाचा संकेत): लहान रक्तवाहिन्यांमध्ये Problem आधी दिसतो. हे Early Vascular Inflammation चं लक्षण असू शकतं.
8. Markers (दाह कसा मोजतो?) - hsCRP (High Sensitivity CRP) - Homocysteine हे Numbers वाढलेले असतील तर Vascular Inflammation चा अंदाज येतो.
9. “Blockage Reverse होतो का?” पूर्णपणे नाही पण Stable करता येतो. तसेच Rupture टाळता येतो हाच खरा उपाय.
Heart Attack हा अचानक होत नाही… तो वर्षानुवर्षे चाललेल्या दाहाचा / Inflammation चा परिणाम असतो.
तुमच्या मते Heart Attack टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? - Inflammation Control - Cholesterol Control - Lifestyle Changes - माहिती नाही
आजपासून विचार बदला.
“Blockage किती?” नाही, “Inflammation किती?” हे महत्त्वाचं.
Dr. Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts