Lifestyle
थायरॉईडची गोळी नेहमी उपाशीपोटीच का घ्यावी?
1. थायरॉईड म्हणजे हॉर्मोन; डोस अचूक हवा! थायरॉईड टॅब्लेट म्हणजे बाहेरून दिला जाणारा हॉर्मोनचा डोस (Thyroxine). शरीरात नीट शोषला गेला तर मेटाबॉलिझम, वजन, पचन आणि मानसिक स्थैर्य नीट राहू शकते.
2. रिकाम्या पोटी घेण्याचं एकमेव कारण: सर्वोत्तम शोषण! थायरॉईडची गोळी घेण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 5:30 ते 7:30 दरम्यान, झोपेतून उठल्यावर लगेच, फक्त पाणी घेऊन, कोणतेही अन्न न घेता. गोळी घेतल्यावर किमान 30–45 मिनिटांनी नाश्ता करावा.
3. काही चुकीच्या समजुती दूर करा: - दूध किंवा चहा घेतल्यावर लगेच गोळी घेणे: ❌ - आठवत नसल्यानं दुपारी घेणे: ❌ - गोळी घेतल्यावर लगेच नाश्ता करणे: ❌
थोडी शिस्त = आयुष्यभर फायदा!
4. या पदार्थांपासून काही वेळ दूर राहा: - दूध, लोणचं, अॅंटासिड्स, आयरन, कॅल्शियम सप्लिमेंट्स - आयुर्वेदिक औषधे वेगळ्या वेळेस घ्या हे गोष्टी थायरॉईड गोळीच्या शोषणात अडथळा आणतात.
5. रोज तीच वेळ ठेवा! सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी वॉर्म पाण्याने गोळी घ्या. वेळ नियमित ठेवा कारण हॉर्मोनसाठी Consistency is the key!
✅ गोळी वेळेवर आणि नीट घेतल्यास: - वजन चांगलं राहते - थकवा कमी होतो - केस गळणे, पचन, मूड स्विंग्स यावर नियंत्रण मिळते - डोस कमी होण्याची शक्यता वाढते
हा मेसेज WhatsApp वर थायरॉईड रुग्णांमध्ये नक्की शेअर करा, ज्यांना याचा योग्य उपयोग होईल.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts