Just For Hearts

Mental Wellness

मंदिरात का जावे? त्याचं विज्ञानाने स्पष्ट केलं महत्व

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

मंदिरात का जावे? विज्ञान सांगतंय त्याचं महत्व.

1. मंत्र, घंटा, ओम, जप – मनावर परिणाम मंदिरातील ध्वनी तरंग (घंटा, ओम, मंत्र) मस्तिष्कात अल्फा वेव्ह्स निर्माण करतात. यामुळे मन शांत होतं, चिंता कमी होते, आणि निर्णयक्षमता सुधारते.

2. देवळात चालणं – सौम्य व्यायाम दर्शनासाठी वेटिंग, प्रदक्षिणा, पायऱ्या हे सगळं सौम्य पण उपयुक्त चालणं. रक्ताभिसरण सुधारतं, पचन चांगलं राहतं.

3. सुवास, दिवा, प्रसाद – इंद्रियांचा ताण कमी धूप, फुलांचा वास, नैवेद्य, दिव्याचं तेज – हे सर्व sensory reset सारखं काम करतात. मेंदूला विश्रांती मिळते.

4. प्रार्थना – मनातलं बोलणं मनातील गोष्टी शब्दांत मांडणं = emotional detox. प्रार्थना म्हणजे केवळ मागणं नाही, तर स्वतःशी संवाद – आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं.

5. श्रद्धा = मानसिक ताकद श्रद्धा कोणावरही असो – ती माणसाला hope, patience आणि inner strength देते. औषध चालतं – पण बरे होण्यासाठी ‘मन’ लागलं पाहिजे.

मंदिर म्हणजे केवळ धार्मिक जागा नाही तर ती मेंदू आणि मनाचं reset बटन आहे.

“देव बघतो” यावर ज्याची श्रद्धा नाही, तोसुद्धा मंदिरातून शांत होऊनच बाहेर पडतो.

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#temple#mind#prayers#mental-health#faith#exercise#sensory-reset
Share:WhatsAppXFacebook