Just For Hearts

Lifestyle

तुमचा विचार तुमचं BP वाढवतो

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

तुमचा विचार तुमचं BP वाढवतो.

OPD मध्ये अनेक रुग्ण सांगतात: - सर, काही वेळा अचानक BP वाढतो. - Reports ठीक आहेत, तरी Fluctuation होतं. - ताण वाढला की BP वाढतो.

हा योगायोग नाही. ही शुद्ध Physiology आहे.

1. Thought → Brain Sympathetic surge → BP rise

मेंदूमधील Amygdala धोका ओळखतो, धोका प्रत्यक्ष असो किंवा कल्पित.

Hypothalamus - Pituitary - Adrenal (HPA) axis सक्रिय होतो.

त्या क्षणी: - Adrenaline वाढतो - Heart rate वाढतो - Peripheral vessels आकुंचन पावतात - BP वाढतो हे काही सेकंदांत होतं.

2. शरीर कल्पना आणि वास्तव यात फरक का करत नाही?

मेंदू “धोका खरा आहे का?” हे तपासत नाही. तो “धोका जाणवतो का?” हे तपासतो.

“जर असं झालं तर?” “माझं BP पुन्हा वाढेल का?” “उद्या काय होईल?”

Repeated negative anticipation → repeated Sympathetic activation.

म्हणूनच विचार सुद्धा BP वाढवू शकतो.

3. BP variability & silent risk

फक्त Average BP महत्त्वाचा नसतो. Repeated Spikes सुद्धा महत्त्वाचे असतात.

- BP variability वाढते - Endothelial stress वाढतो - Vascular stiffness वाढू शकते - Long-term Cardiovascular risk वाढतो

White coat hypertension हे Classical examples - Doctor / Hospital पाहून BP वाढतो. मीठामुळे नाही. Perception मुळे.

4. Chronic Stress BP pattern बदलतो

दीर्घकाळ Sympathetic dominance: - Night-time dipping कमी करू शकतो - Morning BP surge वाढवू शकतो - Overall Vascular load वाढवतो हे Silent पण गंभीर आहे.

5. BP साठी Practical Regulation

- 90-second pause rule - उत्तर देण्याआधी ५ दीर्घ श्वास - Digital sunset - जेवणानंतर शांत चालणं

हे Relaxation तंत्र नाहीत. हे Sympathetic spike कमी करून Vagal tone वाढवण्याचे उपाय आहेत.

जे रुग्ण विचारांच्या Pattern वर काम करतात, त्यांचा BP जास्त स्थिर राहतो. Fluctuation कमी दिसतो. Sleep सुधारते.

शरीर तुमचे विचार ऐकत असतं. प्रश्न आहे तुम्ही त्याला रोज कोणता Signal देता?

तुमचं मन जास्त वेळ कसं असतं? - विचारात - काळजीत - शांत - थांबत नाही

कमेंट करा.

Like म्हणजे Appreciation. Share / Repost / Forward म्हणजे जबाबदारी योग्य आरोग्य-जाणीव पुढे नेण्याची.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#mind-body-connection#blood-pressure#stress#hpa-axis#sympathetic-nervous-system#vagal-tone#white-coat-hypertension#lifestyle-changes
Share:WhatsAppXFacebook