Just For Hearts

Heart Health

Zone 2 Heart Rate Exercise म्हणजे काय?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Zone 2 Heart Rate Exercise म्हणजे काय?

1. Zone 2 म्हणजे शरीर “energy smart” वापरत असलेला टप्पा. या Zone मध्ये शरीर Oxygen चा योग्य वापर करून Fat जाळतं. Lactate कमी तयार होतं, म्हणजे थकवा हळू येतो.

2. Heart Rate किती असतो? (सोपं सूत्र) Zone 2 HR = (220 – वय) × 60–70% उदा. 1. वय 30 → HR ~115–135 2. वय 50 → HR ~100–120 3. वय 65 → HR ~90–110 (औषधं, BP, Diabetes असल्यास थोडा फरक पडू शकतो.)

3. बोलण्याची चाचणी अजूनही gold standard आहे. * पूर्ण वाक्यात बोलता येत असेल → Zone 2 * गाणी म्हणता येत असतील → कमी Intensity * शब्द तुटत असतील → Zone 3 पुढे.

4. “Zone 2 Capacity कमी” म्हणजे काय? काही लोकांचा 5–10 मिनिटांतच HR Zone 3–4 मध्ये जातो. याचा अर्थ Mitochondria (energy factories) नीट trained नाहीत.

5. हे कमी का असतं? * खूप वर्षे sitting Lifestyle * फक्त high-Intensity Exercise (walk नाही) * Sleep कमी, Stress जास्त * Insulin Resistance फिट दिसणं ≠ Metabolic Fitness.

6. Smartwatch काय सांगतो? Smartwatch मध्ये HR alert सेट केल्यास, Zone 2 च्या पुढे गेल्यावर वेग कमी करायचा संकेत लगेच मिळतो. आजचे Watches: * HR Zones * Workout summary * Average HR vs Peak HR * Recovery यातून कळतं आपण कोणत्या Zone मध्ये जास्त वेळ घालवतो.

7. चालताना HR पटकन Zone 3–4 ला गेला तर काय करायचं? घाबरू नका. * वेग कमी करा. * चालण्याची Incline कमी करा. * थोडं थांबा, श्वास normal करा. Goal: Zone 2 मध्ये जास्त वेळ टिकवणं, वेग नाही.

8. High Resting HR असणाऱ्यांनी काय लक्षात घ्यावं? Resting HR >80 असेल तर Zone 2 पटकन cross होऊ शकतो. अशांनी: * Shorter Sessions. * Slow Pace. * जास्त Consistency. हळूहळू Resting HR कमी होतो, हे चांगलं लक्षण.

9. सगळ्या Age Groups साठी Zone 2 उपयुक्त आहे. * तरुण: Stamina, Breath Control * मध्यम वय: Diabetes, BP Control * ज्येष्ठ: Safe Cardiovascular Conditioning Zone 2 = low Risk, high Return.

10. Zone 2 म्हणजे आज नाही, उद्याची तयारी. हा Exercise dramatic वाटत नाही, पण 6–12 महिन्यांत Heart, Lungs, Sugar Control सगळीकडे फरक दिसतो. जे निरोगी व्यक्ती / रुग्ण Zone 2 सातत्याने करतात, त्यांचं Effort Tolerance वाढतं, औषधांची गरज पुढे ढकलली जाते. तुमचा HR चालताना किती वाढतो? Zone 2 टिकतो का पटकन पुढे जातो? अनुभव कमेंटमध्ये लिहा. हा पोस्ट उपयोगी वाटला तर कुणाला पुढे पाठवा. Zone 2 ही सवय शांतपणे आयुष्य वाढवते.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#zone-2-training#heart-health#metabolic-fitness#cardio-health#exercise#fat-burning#stamina#diabetes-control
Share:WhatsAppXFacebook