Just For Hearts

Heart Health

Heart Failure रुग्णांनी रोज काय monitor करायचं? (औषधांइतकंच महत्त्वाचं)

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Heart Failure म्हणजे heart शरीराच्या गरजेनुसार रक्त पुरेसं आणि नीट पंप किंवा स्वीकारू शकत नाही.

Heart Failure म्हणजे daily management. हा आजार एका दिवसाचा नाही, तो रोज समजून, सांभाळून manage करायचा असतो.

बघुयात रोज monitor करायच्या 10 गोष्टी:

1. Weight: दररोज सकाळी, जेवणापूर्वी. 2–3 दिवसांत 1–2 किलो वाढ = शरीरात पाणी साठतंय.

2. BP: खूप कमी किंवा खूप जास्त, दोन्ही त्रासदायक. चक्कर, अशक्तपणा, डोके जड वाटणं BP बदलामुळे असू शकतं.

3. Heart Rate: खूप जलद किंवा अनियमित वाटत असेल तर नोंद ठेवा. Rest मध्येही जास्त असेल तर दुर्लक्ष नको.

4. श्वास: आज चालताना कालपेक्षा जास्त दम लागतोय का? जिने चढताना थांबावं लागतंय का? हा early warning sign असतो.

5. झोपताना श्वास: उशी वाढवावी लागतेय का? रात्री अचानक श्वास लागून उठावं लागतंय का? हे congestion वाढल्याचं लक्षण.

6. पाय / घोट्यांची सूज: संध्याकाळी जास्त सूज येतेय का? बोट दाबल्यावर खड्डा पडतोय का? पाणी साठतंय याचा संकेत.

7. Urine: दिवसभर Urine कमी झालीय का? रात्री जास्त Urine होतेय का? औषधांचा आणि fluid balance चा अंदाज मिळतो.

8. Appetite: भूक कमी होणं, पोट भरल्यासारखं वाटणं हेही Heart Failure worsen होण्याचं subtle लक्षण असू शकतं.

9. थकवा: नेहमीपेक्षा जास्त थकवा? पूर्वी सहज जमायचं ते आता कठीण वाटतंय? हेही ignore करू नका.

10. स्वतःचा pattern ओळखा: प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. तुमचं “normal” काय आहे हे ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं.

लक्षात ठेवा: Heart Failure मध्ये emergency आधी signals येतात. ते signals रोजच्या monitoring मधूनच पकडले जातात.

चर्चा सुरू करूया. यापैकी तुम्ही सध्या काय monitor करता? comment मध्ये 1–2 गोष्टी लिहा. तुमच्या उत्तरांवर पुढच्या posts ठरतील.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts.

#heart-failure#daily-monitoring#cardiac-health#fluid-retention#symptoms#heart-health#patient-care#self-management
Share:WhatsAppXFacebook